मंडणगड - विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

मंडणगड - विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

Published on

rat4p9.jpg
75208
उतेकरवाडी: भातलावणी करताना महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थ, प्राध्यापक वर्ग.
-------
विद्यार्थ्यांनी घेतला
भात लावणीचा आनंद
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी बोरघर-उतेकरवाडी येथील शेतात ग्रामस्थांसोबत भातलावणीचा आनंद घेतला. या उपक्रमात ग्रामस्थ, प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. संगीता घाडगे, डॉ. महेश कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी झाले होते.
सुरवातीला ग्रामस्थांकडून भातरोपे काढणे, भातासाठी शेत तयार करणे व भातलावणी कशा पद्धतीने करावी लागते याची सर्व स्वयंसेवकांनी माहिती करून घेतली. त्यानंतर स्वयंसेवकांनी शेत नांगरून घेतले व पारंपरिक पद्धतीने भाताची रोपे काढून भातलावणी करत आनंद घेतला. या वेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण यांनी हा उपक्रम खरेतर स्वयंसेवकांमध्ये शेतीविषयक एक चांगला सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा ठरला असून, ग्रामीण भागातील जीवनशैली अनुभवण्याची एक चांगली संधी आपल्याला लाभली आहे असे सांगितले तर प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी हा उपक्रम ग्रामीण भागातील जीवन समजून घेण्याचा आहे. अशा प्रकारचे समाजोपयोगी व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभव देणारे उपक्रम यापुढेही राबवण्यात येतील, असे त्यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com