दापोली - पोटच्या मुलाला विकले,दोघाना अटक

दापोली - पोटच्या मुलाला विकले,दोघाना अटक

Published on

पोटच्या मुलाला विकले;
मातेसह दोघांना अटक

दापोली, ता. ४ ः पोटच्या ५ वर्षांच्या मुलाला विकल्याप्रकरणी एका मातेसह आणखी एकाविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गुहागर येथील एसटी स्टँडसमोर हा प्रकार घडला. आरोपी महिला हिने तिच्या ५ वर्षांच्या मुलाला सत्यवान दत्ताराम पालशेतकर (वय ५२, रा. बोऱ्या कारूळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याला विकले. गुरुवारी (ता. ३) पोलिसांना गुप्त माहिती मिळताच विक्री केलेल्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी माहिती घेतली, तेव्हा हा प्रकार उघड झाला. या गंभीर घटनेप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक हिरेमठ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com