एसटी कर्मचाऱ्यांकडून
गणवेश नियमांचे उल्लंघन

एसटी कर्मचाऱ्यांकडून गणवेश नियमांचे उल्लंघन

Published on

75313

एसटी कर्मचाऱ्यांकडून
गणवेश नियमांचे उल्लंघन

संजू परब आक्रमक; आगार प्रमुखांना जाब

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी गणवेश (ड्रेस कोड) बंधनकारक असतानाही अनेक कर्मचारी त्याचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आक्रमक भूमिका घेतली असून यापुढे कर्मचारी गणवेशात न दिसल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने कारवाई करेल, असा इशारा त्यांनी आज येथील आगार व्यवस्थापक नीलेश गावित यांना दिला.
श्री. परब यांनी सावंतवाडी एसटी आगाराला आज भेट दिली. यावेळी त्यांनी आगार प्रमुखांसोबत विविध समस्यांवर चर्चा केली आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींकडे त्यांचे लक्ष वेधले. याचवेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या गणवेश नियमांच्या पालनाबाबत श्री. गावित यांना जाब विचारला. कर्मचारी गणवेशात का नसतात? महामंडळाचे नियम असतानाही त्याची अंमलबजावणी का होत नाही? असे प्रश्न परब यांनी उपस्थित केले. यावर आगार व्यवस्थापक गावित यांनी कर्मचाऱ्यांना लवकरच योग्य समज दिली जाईल आणि गणवेश नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनानंतरही श्री. परब यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.
--------
‘कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तीचा अभाव’
परब म्हणाले, ‘‘आम्ही पाहतोय की, अनेकदा कर्मचारी गणवेशाशिवायच कर्तव्यावर असतात. यामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होते आणि शिस्तीचा अभाव दिसतो. यापुढेही जर कोणत्याही कर्मचाऱ्याने गणवेश नियमाचे उल्लंघन केले आणि तो गणवेशाशिवाय दिसला तर शिवसेना आपल्या पद्धतीने, म्हणजेच जनआंदोलनाच्या माध्यमातून किंवा अन्य योग्य त्या मार्गाने त्याच्यावर ‘बंदोबस्त’ करेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com