न्यायालयात गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल

न्यायालयात गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल

Published on

न्यायालयात गोंधळ
घालणाऱ्यावर गुन्हा दाखल
रत्नागिरी : रत्नागिरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत मोठ्याने आरडाओरड करणाऱ्या एका व्यक्तीवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशोक वसंत मालप (वय ५३, रा. पानगलेवाडी, पावस, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ३) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित अशोक मालप हा मद्यपान करून न्यायालयाच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शांततेचा भंग करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस हवालदार अभिजित पाटील यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
----
मोबाईल - दुचाकी
पळवणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी : खेडशी येथे तरुण घरात झोपलेला असताना त्याची दुचाकी व मोबाईल संशयिताने पळवून नेला. मोबाईलचा वापर करून एयू बॅंकेच्या अंकाउंटमधून ३३ हजारांची रक्कम पळवली. ग्रामीण पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अकरम शेख (रा. पनवेल) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) दुपारी बारा ते दोन या कालावधीत गुरूनाथ कळंगुटकर यांच्या घरी एकतानगर, खेडशी-रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक चंपालाल चौधरी (वय ३३, रा. गुरूनाथ कृष्णा कळंगुटकर यांच्या घरी भाड्याने, एकता नगर, खेडशी रत्नागिरी हे त्यांच्यासोबत राहणारा संशयित अकरम शेख याने गुरूनाथ कळंगुटकर हे घरात झोपलेले असताना त्यांच्या मालकीचा मोबाईल व दुचाकी (क्र. एमएच-०८ यु २८३१) पळवली. त्यावर तो थांबला नाही तर कळंगुटकर यांच्या मोबाईलचा वापर करून फिर्यादी यांच्या एयू बॅंकेच्या खात्यातून ३३ हजार रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी गुरूनाथ कळंगुटकर यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.
---
डोंगरधार येथील
रिक्षाचालकाचा मृत्यू
रत्नागिरी ः डोंगरधार (ता. राजापूर) येथे बेशुद्धावस्थेत पडलेल्या रिक्षाचालकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नीलेश काशिनाथ शिरवडकर (वय ४६, रा. कणेरी टोकळवाडी, ता. राजापूर) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. ३) दुपारी साडेबाराच्या सुमारास डोंगरधार येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरवडकर हा डोंगरधार-दत्तवाडी येथे रिक्षा (एमएच-०८-बीसी-०८५३) घेऊन प्रवासी सोडण्यासाठी गेला होता. परत येत असताना तो अचानक बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
.....
एसटीला धडकून
दुचाकीस्वार जखमी
रत्नागिरीः शहरातील जेलनाका येथे एसटी आणि दुचाकीच्या अपघातात स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सिद्धेश रमेश कदम (वय २८, रा. राजेंद्रनगर, मारूती मंदिर, रत्नागिरी) असे जखमी स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास जेलनाका येथील रस्त्यावर घडली. सिद्धेश हे दुचाकी (एमएच-०८-एवाय-१५२४) घेऊन आठवडा बाजार ते मारूती मंदिर असे जात असताना एसटीला (एमएच-१४-एलएक्स-७१३६) त्यांची धडक बसली. यामध्ये सिद्धेश जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
----------
रेल्वेतून पडून
महिला जखमी
रत्नागिरी ः रेल्वेच्या गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेसने मुंबईकडे जाणारा महिला गाडीत चढत असताना पडली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. हर्षदा कुणाल रजपूत (वय ३१, रा. मनवलपाडा, विरार) असे जखमी महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) दुपारी दोनच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा व तिचे पती, नातेवाईक असे संपर्कक्रांती एक्स्प्रेसने मुंबईकडे जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथून जात असताना गाडीत चढत असताना हर्षदा या पाय घसरून पडल्या. त्यामध्ये त्या जखमी झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com