सिंधुदुर्ग सहकारी पतसंस्था अध्यक्षपदी सुनील राऊळ
75332
सिंधुदुर्ग सहकारी पतसंस्था
अध्यक्षपदी सुनील राऊळ
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुनील राऊळ, तर उपाध्यक्षपदी नंदकिशोर वडगावकर यांची बिनविरोध निवड झाली. फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सावंतवाडी) सुजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
फेडरेशनच्या कार्याध्यक्षपदी जॉय डॉन्टस, उपाध्यक्षपदी सुनील नाईक यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन संचालक बाबूराव कविटकर, समीर वंजारी, सुभाष चौधरी, विष्णू पराडकर उपस्थित होते. अध्यक्ष राऊळ यांनी पतसंस्था फेडरेशन हे सहकारी पतसंस्थांसाठी आवश्यक असून फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच पतसंस्थांच्या वसुलीबाबत विविध स्तरावर मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करून सर्वसामान्यांना उभारी देण्याचे पतसंस्था कार्य करत आहेत. त्यामुळे ही पतसंस्था चळवळ सक्षमपणे चालविण्यासाठी फेडरेशनचे प्रयत्न राहतील. याकरिता जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांचे सहकार्य अपेक्षित असून जिल्ह्यातील पतसंस्थांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी पतसंस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.