भाजपच्या आडीवरेकरकडून वाढदिवसानिमित्त मुलांना ''एनआयई''
75351
भाजपच्या आडीवरेकरांकडून
वाढदिनी मुलांना ‘एनआयई’
कळसुलकर स्कूलमध्ये उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या प्रत्येक वर्गासाठी ‘सकाळ एनआयई’ हे मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त असलेले साप्ताहिक सुरू केले. आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा उपक्रम राबविला.
नेहमीच समाजकार्यातून राजकारणामध्ये सक्रिय असलेले श्री. आडीवरेकर हे आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे. दरवर्षी ते आपला वाढदिवस काहीतरी वेगळ्या उपक्रमातून साजरा करतात. वाढदिवस हा समाजकार्याने साजरा व्हावा, अशी त्यांची नेहमी भावना राहिली आहे. यंदाचा त्यांचा पन्नासावा वाढदिवस असल्याने तो काहीतरी वेगळा व्हावा या हेतूने त्यांनी ‘सकाळ’ समूहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक क्षमतेवर टाकणारे ‘सकाळ एनआयई’ हे साप्ताहिक कळसूलकर हायस्कूलमधील प्रत्येक वर्गाला वितरित केले. या वृत्तपत्रातून दररोज बौद्धिक क्षमतेवर भर टाकणारा मजकूर तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा मजकूर प्रसिद्ध केला जातो.
या उपक्रमाबाबत श्री. आडिवरेकर म्हणाले, ‘‘माझा वाढदिवस हा नेहमी समाजकार्यातून साजरा करण्याचा माझा प्रयत्न असतो. गोरगरीब जनतेला मदत करण्यासोबतच अनाथ, अपंग विद्यार्थ्यांसोबत आजपर्यंत वाढदिवस साजर करत आलो आहे. यावर्षीही शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे सकाळ एनआयई साप्ताहिक विद्यार्थ्यांना वितरित करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये आपला हात असावा तसेच त्यांची बौद्धीक क्षमता वाढावी या हेतूने हा उपक्रम राबवला.’’ यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमेय पै, अमित गवंडळकर, सुमित वाडकर, डॉ. मिलींद लोकेगावकर, कळसुकर हायस्कूलचे संचालक मोहन वाडकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष अॅड. अभिजित पणदूरकर, मुख्याध्यापक सुर्यकांत भुरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.