जिल्ह्यात २५ हजार विद्यार्थ्यांना शाळेतच पासचे वाटव

जिल्ह्यात २५ हजार विद्यार्थ्यांना शाळेतच पासचे वाटव

Published on

शाळेतच २५ हजार विद्यार्थ्यांना पासचे वाटप
रत्नागिरी एसटी विभाग; नऊ आगारातून अवघ्या १५ दिवसात कार्यवाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्यावतीने यंदाच्या वर्षी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत वितरित करण्यात आले. १६ जूनपासून ही मोहीम सुरू झाली. जिल्ह्यात नऊ आगारातून अवघ्या १५ दिवसात अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक सचिन सुर्वे यांनी दिली.
यापूर्वी शहरासह ग्रामीण भागातील मुले-मुली एसटी बसस्थानकातून पास घेत होते. पासेससाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावत होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण येत होती. या सर्वांची अडचण ओळखून महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्यावतीने पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एसटीचा पास थेट शाळेत वितरण करण्याचे आदेश दिले होते. मुलींमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने पाऊल घट्ट करावे यासाठी बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन एसटी विभाग प्रवासीसेवा केली जात आहे. त्यामुळे १६ जूनपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध शाळा, महाविद्यालयात जाऊन पासचे वितरण केले. मुलींसाठी त्रैमासिक, मुलांसाठी मासिक कालावधीसाठी पास दिले जात आहेत. ज्या ज्या शाळा महाविद्यालयांनी पासची मागणी केली त्यांना एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतः शाळेत जाऊन पासेसचे वितरण केले. दरम्यान, महाविद्यालयातील विद्यार्थी, सवलत नसलेल्यांनी रांगेत उभे राहून पासेस काढली आहेत अशा विद्यार्थ्यांना पास देण्याची सोय महाविद्यालयात करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
----
कोट...
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेतून हजारो पास थेट शाळेत जाऊन वाटप करण्यात आले आहेत. काही सवलतीचे पास मुलांना देण्यात आले आहेत. ज्या शाळांना पासेसची आवश्यकता आहे त्यांनी मागणी करावी, त्यांना पास देण्यात येतील.

-बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com