सिंधुदुर्गात ‘अभिराम’ संकल्पना राबवू
75471
सिंधुदुर्गात ‘अभिराम’ संकल्पना राबवू
हर्ष शिंदे ः बांदा रोट्रॅक्ट क्लब कार्यकारिणीचे पदग्रहण
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ : हिंदू संस्कृती ही अतिप्राचीन आहे. संपूर्ण जगाला दिशा देण्याचे काम हिंदू संस्कृती करत आहे. हिंदू संस्कृतीच्या रुढी, प्रथा, परंपरा या जनमानसांत रुजविण्याचे काम ‘रोट्रॅक्ट’च्या माध्यमातून हाती घेतले आहे. हिंदू संस्कृतीचे जनक प्रभू श्री राम यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यावर्षी ‘अभिराम’ ही संकल्पना रोट्रॅक्टतर्फे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे रोट्रॅक्टचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष हर्ष शिंदे यांनी येथे सांगितले.
रोटरी क्लब बांदाच्या युवा विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोट्रॅक्ट क्लब बांदाच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ येथील आनंदी मंगल कार्यालयात झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून रोहन कुबडे यांची निवड करण्यात आली. सचिवपदी डॉ. मीताली सावंत तर सहसचिव संकेत वेंगुर्लेकर, खजिनदार शिवम गावडे यांची निवड करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. शिंदे बोलत होते.
येथील पीएमश्री बांदा केंद्रशाळा क्र. १ च्या मुलांनी सादर केलेला नृत्याविष्कार लक्षवेधी ठरला. रोहन कुबडे यांनी, या वर्षात अधिकाधिक समाज उपयोगी उपक्रम राबविणार आहोत. ‘अभिराम’ या जिल्हा संकल्पनेने प्रेरित होऊन वर्षभर विविध धर्म जागृती विषयक कार्यक्रम घेण्यात येतील. युवा पिढीने रोट्रॅक्ट सोबत येऊन सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष शिवानंद भिडे यांनी मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, यावर विविध शिबिरे व अभ्यास वर्ग घेण्यावर भर देणार आहोत. रोटरी व रोट्रॅक्ट एकत्र येऊन शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य विषयक उपक्रम राबवू, असे सांगितले. उपाध्यक्ष अनिकेत जाधव, बांदा अध्यक्ष शिवानंद भिडे, अवधूत चिंदरकर आदी उपस्थित होते. डिम्पल कुबडे व संकेत वेंगुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिताली सावंत हिने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.