‘बांदा पंचक्रोशी’च्या अध्यक्षपदी गायतोंडे

‘बांदा पंचक्रोशी’च्या अध्यक्षपदी गायतोंडे

Published on

75473


‘बांदा पंचक्रोशी’च्या अध्यक्षपदी गायतोंडे

बिनविरोध निवड; रुपेश माजगावकर उपाध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेच्या अध्यक्षपदी नारायण गायतोंडे तर उपाध्यक्षपदी रुपेश माजगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. २०२५ ते २०३० या कालावधीसाठी निवडण्यात येणाऱ्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया संस्थेच्या कार्यालयात झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी निबंधक कार्यालयाचे प्रमोद कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव दीपक चव्हाण यांनी काम पाहिले. कार्यकारिणी सदस्यपदी राजेश पावसकर, प्रमोद देसाई, बापू आईर, जयदीपक गवस, समीर पेळपकर, लवू जाधव, यशोदा सावंत यांची बिनविरोध निवड केली. नूतन अध्यक्ष गायतोंडे यांनी सलग पंधरा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले आहे. राजकारणासोबतच त्यांचे सामाजिक व सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना दरवर्षी बोनस रकमेचे वाटप होते. सन २०१८-१९ मध्ये ३ लाख ५० हजार रुपये, १९-२० मध्ये ३ लाख ५५ हजार रुपये, २०-२१ मध्ये ४ लाख ८८ हजार रुपये, २१-२२ मध्ये ६ लाख ७८ हजार रुपये, २२-२३ मध्ये ९ लाख ६० हजार रुपये बोनस रकमेचे वाटप करण्यात आले. संस्थेत दिवसाला सरासरी ६५० लिटर दुधाचे संकलन होते. दुधाची विक्री करून उरलेले दूध हे गोकुळ संघास दिले जाते.
..................
कोट
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही दूध संस्था कार्यरत आहे. दूध संकलन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आकस्मिक कर्ज तसेच दुग्ध उत्पादन वाढीसाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. ही दूध संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट दूध संस्था बनविण्याचा मानस आहे.
- नारायण गायतोंडे, अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com