मल्लसम्राट प्रतिष्ठानचे कार्य गौरवास्पद
75474
मल्लसम्राट प्रतिष्ठानचे कार्य गौरवास्पद
अमोल चव्हाण ः झाराप विशेष शाळेला साहित्य
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेद्वारे विविध विधायक उपक्रम राबविले जातात. समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम संस्था करीत आहे. आज खऱ्या अर्थाने युवकांना चांगली दिशा यातून मिळत असून प्रतिष्ठांच्या माध्यमातून सतत भरीव सामाजिक कार्य देखील घडत आहे. ‘मल्लसम्राट’च्या या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी काढले.
मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने जीवदान विशेष शाळा झाराप (मतिमंद प्रवर्ग) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले. यावेळी प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख होते. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद धुरी, महिला जिल्हाध्यक्षा मानसी परब, मल्लसम्राटचे सचिव ललित हरमलकर, उपाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सहसेक्रेटरी फिजा मकानदार, निरवडे ग्रामपंचायत सदस्य जयराम जाधव, पीआरओ साबाजी परब तसेच ह्युमन राईट वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद कांडरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील नेवगी, मुख्याध्यापिका सिस्टर रोजम्मा जोब आदी उपस्थित होते.
सदस्य नागेश सूर्यवंशी व कामाक्षी महालकर यांचा वाढदिवस विशेष बालकांसोबत केक कापून साजरा केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिस्टर लिसन, सिस्टर ब्रिसा, स्नेहा परब, हेमंत साळुंके, तनया मोरजकर, रश्मी रेडकर, ईशा सूर्याजी, हरीश नलावडे, भिवाजी आकेरकर, श्रीवर्धन आरोसकर, गौरव जाधव आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संयोजन जावेद शेख, ललित हरमलकर, प्रा. रुपेश पाटील, नागेश सूर्यवंशी, बुधाजी हरमलकर, दशरथ गोंड्याळकर, देवेश पालव, गणेश राऊळ, किशोर हरमलकर, नासीर मकानदार, साबाजी परब, गौरव कुडाळकर, सुनील नेवगी, जयराम जाधव, फिजा मकानदार, कामाक्षी महालकर, मिताली राऊळ, दीपाली राऊळ, सान्वी बिद्रे, संचिता केनवडेकर, श्रुती सावंत व भाविका कदम यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.