सदर-अति खाणं अन् मसणात जाणं म्हण खोटी ठरवल्येयं
गावच्या मालका .........लोगो
खवय्ये वाढप्याला म्हणायचे एक वाढ. वाढपी नवीन असला की, तो एक लाडू/पुरणपोळी/भाजणीचा वडा वाढत असे; पण जुना मुरलेल्या वाढप्याला कळायचे की, एक म्हणजे पाचुंदा! पाचुंदा म्हणजे पांच. हे असले खवय्ये जेवणे झाल्यावरही हात धुतल्यावरही पैजेने परत दुप्पट जेवायचे. पुरणपोळ्यांबरोबर अर्धापाव लिटर तूपही रिचवायचे, असे असूनही त्या काळात लठ्ठपणा हा रोग नव्हता. अशा खाणाऱ्यांबरोबर आपणही पंक्तीत असलो की, वाण नाही; पण गुण लागला या उक्तीप्रमाणे चार घास जास्त जायचे.
-rat५p२१.jpg-
P२५N७५४८२
- अप्पा पाध्ये गोळवलकर, गोळवली
---
अति खाणं अन् मसणात जाणं
म्हण खोटी ठरवल्येयं...
पूर्वी खेडेगावात एकत्र कुटुंबपद्धती होती. त्याचे फायदे-तोटेही होते. अर्थात, नफा-नुकसान प्रत्येक बाबतीत असतेच म्हणा; पण एकत्र कुटुंबाचे फायदे जास्त होते. असो, अशा कुटुंबात संस्कृती संवर्धनाला मोठा वाव असे सणवार धुमधडाक्याने साजरे होत असत. कुटुंबात २५-३० सदस्य असायचेच. लग्ने-मुंजी हौसेनं साजऱ्या केल्या जात त्याचबरोबर श्राद्ध-पक्षही श्रद्धेने केल्या जात असत आत्तासारखे तेराव्याचे; वर्षश्राद्धाचे ‘पॅकेज’ नसायचे त्या वेळी.
रोजच्या जेवणातील काही भाग कावळ्यांना काकबली म्हणून असायचा. गायीला पान असायचे. कुत्र्या-मांजराना अन्नघास असायचाच तर थोडक्यात काय तर माणसाच्या मेंदूचा विकास झाला नव्हता, असे आजची विकसित पिढी म्हणते. असो, तो वादाचा मुद्दा असू शकतो तर आमच्या घरीही हे सणवार, सोहळे मोठ्या हिरीरिने साजरे व्हायचे. त्यासाठी भावकीतील, गावकीतील लोकं, नातेवाईक आवर्जून असायचेच.
माझी मुंज झाली तेव्हा कडवई या माझ्या आजोळातील मुस्लिम मोहल्ल्यात दावत (निमंत्रण) फिरली होती अन् बावीस ताशांचे जोड घेऊन मुस्लिम वाजपी आले होते तसेच प्रतिष्ठित व्यक्तीही होत्या. त्यातील रत्नू हुसैन यानी दोन-तीन संस्कृत मंगलाष्टकेही म्हटली होती. तर अशा शुभकार्यात जेवणावळीच्या पंक्ती उठायच्या अन् त्याही जमिनीवर. तेव्हा बुफे (बुभुक्षितांच्या फेऱ्या) नसायचा श्लोक. आर्या अन् आग्रह असायचा पक्वान्नाचा. आमच्याकडे देवरूखातील भटजी असायचे. त्यांना आग्रह करून खाऊ घालण्यात यजमानाला काय आनंद व्हायचा, विचारून सोय नाही.
आमच्या घरी एक भार्गव अण्णा म्हाडदळकर म्हणून राहायला होता. तो आठ-दहा भाकऱ्या खाऊन वर शेराचा भात खायचा अन् लगेच कुऱ्हाडीने बैलगाडीभर लाकडे फोडायचा. त्यामुळे जठराग्नी कायम प्रदिप्तच. आमच्याइथे एक पाहुणा येतो. त्याला सनराइज हॅटेलवाल्या आमच्या भावेने मिसळ खायला बोलावले अन् सांगितले की, मया लागेल तेव्हढी मिसळ अन् पाव खा पैसे घेणार नाही तर या पठ्ठ्याने बावीस पाव अन् दोन जग भरून रस्सा अन् मिसळ खाल्ली अन् नंतर म्हणतो कसा, जरा लाजलो म्हणून नायतर अजून साताठ पाव खाल्ले असते. असे खवय्ये आता विरळच राहिलेत.
एकदा आमच्याकडे एकाने कटवड्यावर असाच ताव मारल्यावर रात्री संगमेश्वरात डॉक्टराकडे न्यायला लागल्याचेही स्मरते. अति खाणं अन् मसणात जाणं, ही म्हण खोटी ठरवल्येय या माणसांनी. अशा या समस्त खवय्यांवर बल्लवाचार्याची सदैव कृपा राहो अन् आमच्यासारख्यांना यांना आग्रहाने जेवू घालून समाधान अन् आनंद मिळो, अशी अन्नपूर्णेजवळ प्रार्थना.
(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.