परंपरेत फडकरी म्हणून दिंडीत सहभागाचे भाग्य

परंपरेत फडकरी म्हणून दिंडीत सहभागाचे भाग्य

Published on

आषाढी एकादशी विशेष--- लोगो


-rat५p११.jpg-
२५N७५४५६
मंडणगड ः वासकर फड, पंढरपूर फड मालक गुरूवर्य चैतन्य महाराज वासकर व ऋषिकेश (आबा) महाराज वासकर मालक दिंडीत सहभागी एकनाथ आप्पा, निष्ठावंत वासकर फड सेवेचे वारकरी दिनेश महाराज पोस्टुरे, योगेश महाराज पवार, सुरेश बाईत, पांडुरंग रांगले, किरण माळी, राजेश्री सापटे व अन्य.
---
तुकोबारायांच्या परंपरेत मंडणगडवासीय दिंडीत
वासकर फडात फडकरी; आंळदी-पंढरपूर पायी वारी, ५० वर्षांची पंरपरा
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ ः संत तुकोबारायांची परंपरा असणाऱ्या वारीमध्ये वासकर फडात फडकरी म्हणून मानाच्या पहिल्या आणि सातव्या नंबरच्या दिंडीत सहभागी होण्याचे भाग्य तालुक्यातील वारकरी यांना लाभले आहे. वासकर फड ही वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाची परंपरा आहे. मल्लाप्पा वासकर (१६३१-१७२१) यांनी फडांना संघटित स्वरूप दिले आणि वारकरी संप्रदायात फडाला मानाचे स्थान मिळाले. वासकर फडाचे मुख्य काम म्हणजे पंढरपूर येथे कीर्तन, भजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
महाराष्ट्रातील संतपंरपरेने भक्तीमार्गासह सर्व श्रेष्ठ मानलेल्या व अखिल विश्वाचा औत्सुक्याचा विषय असलेल्या आषाढीवारीचे तालुक्यातील रोपटे बाळोजी जोशी महाराज यांनी तालुक्यातील पडवे या गावी पन्नास वर्षापूर्वी लावले. भौतिक सुखामागे धावणाऱ्या मानवी मानसिकतेच्या बदलत्या काळातही गेली पन्नास वर्षे ही पंरपरा अव्याहत सुरू आहे. ते मानवी विकार व व्यसनाधिनेतपासून दूर राहण्याचा संदेश देत दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातून आळंदी येथे पायी वारीसाठी तालुक्यातील वारकरी मार्गस्थ झाले आहेत. गुरूवर्य विठ्ठल दादा वासकर महाराज सोलापूर हे माजी न्यायाधीश असून, फडाचे मुळ पुरुष आहेत. तुकोबारायांची मुळ पंरपरा असणारी तेरावी पिढी सध्या वारी करत आहे. फडकरी म्हणून वासकर फडाला पहिल्या आणि सातव्या दिंडीचा मान आहे. एका दिंडीत अडीच ते तीन हजार वारकरी चालत असतात. या दिंडीमध्ये मंडणगड तालुक्यातील ढांगर, गवाणवाडी, पालवणी, मंडणगड, आंबडवे, पंदेरी, पाले या गावांच्या परिसरातील वारकरी सहभागी झाले आहेत. मंडणगड तालुक्यातील मुळच्या म्हाप्रळ गावातील कपडेकर कुटुंबास आळंदी येथे पूजनाचा मान आहे. तालुक्यातील वारकरी वाहनाने आळंदीला पोहचून पादुका व संतांच्या पालखीचे पंढरपूर यात्रेच्या पायी प्रयाणाच्या सोहळ्यात सहभागी होतात. आळंदी ते पंढरपूर हा १९ दिवसांचा पायी प्रवास करतात.
---
कोट
तालुक्यात अनेक प्रकारच्या कला जोपासल्या जातात. वारकरी कीर्तन हा भक्तीमार्ग असून, भक्तीज्ञान व संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार करणे हा त्याचा उद्देश असून, लौकिकासाठी किंवा देखाव्यासाठी नव्हे तर स्वतःची भक्ती व समाजात प्रबोधान व्हावे, संतविचार घराघरात पोहचून हिंदू संस्कृती वाढावी, हे अभिप्रेत व अपेक्षित आहे.
दिनेश महाराज पोस्टुरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com