शिक्षक संघटनेचे आंदोलन स्थगित
शिक्षक संघटनेचे
आंदोलन स्थगित
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे संघटनेच्या मागण्या व विशेषतः दरमहा होणाऱ्या पेन्शन देयकाबाबत दिरंगाईसंदर्भात सातजुलैला ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवसीय आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, गुरुवारी (ता. ३) सिंधुदुर्ग जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांचे शिष्टमंडळ व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेत तोडगा निघाल्याने सात जुलैला होणारे एकदिवसीय आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जिल्हा कार्यकारिणीने घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातील निवृत्त शिक्षकांनी आंदोलनस्थळी जाऊ नये, असे आवाहन तालुकाध्यक्ष झिलू गोसावी, तालुका सचिव विठ्ठल कदम तसेच जिल्हा प्रतिनिधी भरत आवळे व किशोर नरसुले यांनी केले आहे.
...................
सेवानिवृत्त सेवक
संघाची आज सभा
मालवण ः तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा उद्या (ता. ६) सायंकाळी पाचवाजता टोपीवाला हायस्कूल या ठिकाणी आयोजित केली आहे. यावेळी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अजित गवंडे आणि सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.