कन्या अमेरिकेत दी टॉप वूमन लीडर्स ऑफ इअर

कन्या अमेरिकेत दी टॉप वूमन लीडर्स ऑफ इअर

Published on

- rat५p१.jpg-
२५N७५४०९
शमा बुटाला-केसकर
----------
खेडची कन्या बनली ‘दी टॉप वूमन’
शाम बुटाला-केसरकर - कोकणाशी जोडली नाळ
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ ः कोकणातील खेडच्या एका लेकीने आपल्या स्वकर्तृत्वावर यशाचे शिखर गाठत अमेरिकेत सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या व सर्वश्रेष्ठ असणऱ्‍या ‘दी टॉप वूमन लीडर्स ऑफ इअर २०२५’ या किताबाला गवसणी घातली आहे. हा सर्वोच्च सन्मान मिळवणारी ती प्रथम महाराष्ट्रीयन आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंचवली या छोट्याशा गावातील शमा बुटाला व लग्नानंतरच्या शमा केसकर यांनी हे यश मिळवले आहे. त्या सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत; मात्र त्यांची नाळ आजही कोकणाशी जोडली गेली आहे. त्यांचे कुटुंब हे मुंबई अंबरनाथ येथे वास्तव्यास असून, त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण हे मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. त्यानंतर तिने अमेरिकेत मास्टर्स इन कम्युनिकेशन ही पदवी संपादन केली. अमेरिकेत तिने विविध टेक कंपनीत वरिष्ठ पदावर काम करून नावलौकिक मिळवला व स्वतःला सिद्ध केले. त्या सध्या अमेरिकेत स्टेल्थ एआय स्टार्टअप् कंपनीत मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल अमेरिकेने घेत केसकर यांना यंदाचा दी टॉप वूमन लीडर्स ऑफ इअर २०२५ हा किताब देऊन सन्मानित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com