करूळमध्ये जनावरांना 
लंपी रोगाचे लसीकरण

करूळमध्ये जनावरांना लंपी रोगाचे लसीकरण

Published on

75508

करूळमध्ये जनावरांना
लंपी रोगाचे लसीकरण
तळेरे, ता. ५ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत (कै.) राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदूतांतर्फे करूळ येथे जनावरांना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हे शिबिर घेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बागवे आणि डॉ. राम वजीर यांनी जनावरांना लंपी त्वचारोगावर लसीकरण केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सरपंच समृद्धी नर आणि उपसरपंच पुरुषोत्तम तानवडे तसेच शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले. या शिबिरामध्ये विश्वजीत होनमाने, प्रमोद जाधव, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, आनंद तेली, रोहन पवार, आदित्य सावंत, एम. डी. मोलाना, प्रसाद काकडे या कृषिदूतांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज संते व कार्यक्रम समन्वयक सुशीलकुमार मोटे यांचे मार्गदर्शन मिळाले.
---------
75509

रामेश्‍वर आंबा संशोधन
उपकेंद्रात वृक्षारोपण
देवगड, ता. ५ ः कोकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून तालुक्यातील रामेश्‍वर येथील आंबा संशोधन उपकेंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आणि कृषी सप्ताह साजरा करण्याच्या निमित्ताने हा उपक्रम घेण्यात आला.
कोकण कृषी मित्र गटाने रामेश्‍वर येथील आंबा संशोधन उपकेंद्रात कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज, श्री. चव्हाण आणि श्री. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आंबा व कोकम झाडांची लागवड करून सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमाचा उद्देश शाश्वत शेती व पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करणे हा होता. हरित उपक्रमात योगदान देण्याची संधी यातून मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com