-मेर्वी शाळेत विद्यार्थ्यांची दिंडी

-मेर्वी शाळेत विद्यार्थ्यांची दिंडी

Published on

-rat५p१२.jpg-
२५N७५४५७
पावस ः मेर्वी शाळेत आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
----------
मेर्वी शाळेत विद्यार्थ्यांची दिंडी
पावस, ता. ५ ः पायी हळूहळू चाला, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, असा जयघोष करत रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी शाळेत विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. हा दिंडी सोहळा मुख्याध्यापिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, संजय पावसकर, पदवीधर शिक्षक डॉ. आनंद सावंत, शिक्षिका ऐश्वर्या गुरव आदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय वातावरणात झाला. टाळमृदुंग, पताका, भगवे झेंडे हातात घेऊन नऊवारी साड्या, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारकरी संप्रदायातील वेशभूषा परिधान करून मेर्वी शाळेतील विद्यार्थी विठोबाचा जयघोष करत होते. विठ्ठलाची वेशभूषा रुद्र चंदूरकर आणि रुक्मिणीची वेशभूषा श्रीया चंदूरकर यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com