धामापूर बौद्धवाडी शाळेत वारकऱ्यांचा मेळा

धामापूर बौद्धवाडी शाळेत वारकऱ्यांचा मेळा

Published on

75513

धामापूर बौद्धवाडी शाळेत वारकऱ्यांचा मेळा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ ः ‘आनंददायी शनिवार’अंतर्गत आषाढी एकादशीचे औचित्य साधून धामापूर बौद्धवाडी (ता. मालवण) शाळेत वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. सकाळी सर्व मुलांनी वारकरी वेशभूषा करून, डोक्यावर तुळस व विठ्ठल-रखुमाईची मूर्ती घेऊन कार्यक्रमात रंगत आणली. शाळेसमोर टाळाच्या निनादात रिंगण सोहळा पार पडला. यावेळी विविध फुगड्या, अन्य कार्यक्रम झाले. अंगणवाडीच्या मुलांचा देखील उत्साह उल्लेखनीय होता. रिंगण सोहळ्यानंतर दिंडी वाडीतील सर्व घरांपर्यंत गेली. आपण सर्वजण पंढरपूरला आल्याचा आभास सर्व आबाल-वृद्धांना झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शैलेश व संदेश धामापूरकर यांनी वेशभूषा केली. अंगणवाडी सेविका शीतल नाईक व सहकारी अश्विनी धामापूरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पालक, ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक दीपक गोसावी, सहकारी शिक्षक शीतल लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी गोसावी यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व व वारकरी परंपरा या विषयी माहिती सांगितली. शिक्षिका शीतल लोखंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com