टाळ मृदंगांचा ठेका, विठुनामाचा गजर

टाळ मृदंगांचा ठेका, विठुनामाचा गजर

Published on

75515

टाळ-मृदंगाचा ठेका, विठूनामाचा गजर

आषाढी वारीचे निमित्त; जिल्ह्यातील शाळांमध्ये वृक्षदिंडी, अभंगवाणी


शिवडाव माध्यमिक विद्यालय
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ५ ः शिवडाव (ता. कणकवली) माध्यमिक विद्यालयात आषाढी वारीच्या निमित्ताने वृक्षदिंडी आणि अभंगवाणी कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी रिंगण करून विठूनामाचा गजर केला. अंश तेली या विद्यार्थ्याने विठूरायाची आणि किमया सरंगले हिने रुक्मिणीची साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. जिल्ह्यातील अन्य शाळांमध्येही विठूनामाचा जयघोष करत वारीची परंपरा जपली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी होत्‍या. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानामध्ये आषाढी वारीनिमित्त रिंगण करून विठूनामाचा गजर आणि अभंग गायन केले. त्‍यानंतर शाळेपासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत वृक्षदिंडी काढली. तसेच ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण केले. सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. सर्व मुली नऊवारी साडी, तर सर्व मुले पांढरा कुर्ता आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून सहभागी झाले.
रिंगण सोहळ्यात सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये रिंगण पूर्ण केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी फुगड्या घालत, विठूनामाचा जयघोष करून आनंद व्यक्त केला. ‘अभंगवाणी’मध्ये अंश तेली, हर्ष लाड, श्रीतेज गावकर, रिया गावकर, तनुज गावकर, श्रद्धा पवार, धनश्री शिरवडेकर, गौरी सावंत, सान्वी घाडीगावकर, रूपल वर्दम, नेहल शिवडावकर, रमिला कुमारी, पूर्वा गावकर, हर्षाली लाड, श्रेयस जाधव, सेजल शिवडावकर यांनी आपल्या अभंगातून शालेय वाद्यवृंदाच्या साथीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सहाय्यक शिक्षक स्वप्नील तांबे यांनी आपल्या सुरेल आवाजातून दोन अभंग सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मुख्याध्यापक मुकेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. के. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. धनश्री शिरवडेकर व प्रांजना गावकर यांनी सूत्रसंचालन केले. रिया गावकर हिने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com