चिपळूण ः पाणीपुरवठा , वीज, गॅस वाहिनीच्या कामांची चौकशी करा

चिपळूण ः पाणीपुरवठा , वीज, गॅस वाहिनीच्या कामांची चौकशी करा

Published on

पाणीपुरवठा, वीज, गॅस पाईपलाईन
कामांची चौकशी करावी : भागवत
चिपळूण, ता. ६ : चिपळुणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या पाणीपुरवठा लाईन, वीजपुरवठा लाईन व गॅस पाईपलाईनच्या कामांची त्रयस्त शासकीय संस्थेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चिपळूण शहरातील महामार्ग रुंदीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या नवीन पाणीपुरवठा लाईनचे काम एप्रिल-मे २०२१ पासून सुरू असून, ते पूर्ण झालेले नाही. नवीन सर्व पाणीपुरवठा लाईन एक वर्षापूर्वी टाकल्या असून, त्यांची प्रेशर टेस्ट अजूनही घेतलेली नाही. केवळ लिकेज टेस्टिंगसाठी पाणी सोडले असता जवळपास ६ ते ७ ठिकाणी गळती आढळली. याच पाणीपुरवठा लाईनची प्रेशर टेस्ट घेताना काय अवस्था असेल? या कामावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग देखरेख करत आहे. फेडरल बँक ते सीता निवास लॉजदरम्यानचे काम त्यामुळे पूर्ण करता येणार नाही. प्रांत कार्यालय शेजारील नाल्यातील जुन्या पाणीपुरवठा लाईन चालू असल्याने नाल्यावरील मोरीचे काम पूर्ण होऊ शकणार नाही.
गेले महिनाभर प्रांत कार्यालयासमोर एका जलवाहिनीस गळती असून, त्याची दुरुस्ती झालेली नाही. याबाबत पालिका आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. या पाणीपुरवठा लाईनवर काही ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या असून, त्या प्रवाहित केल्या आहेत. पाणीपुरवठा लाईनवर विजेचे पोल उभे केले आहेत. गटारातून वीजवाहिन्या टाकल्या आहेत. भूमिगत वीजवाहिन्यांच्या ठिकाणी योग्य अंतरावर त्याची माहिती देणारे पोल उभे केलेले नाहीत. या वीजवाहिन्यांच्या कामावर महावितरणची देखरेख होती. शिवाजीनगर बसस्थानकशेजारील सीएनजी पंप ते अभिषेक हॉटेल गल्ली गॅस पाईपलाईनदेखील टाकली आहे. भविष्यात या चुकीच्या कामांमुळे दुरुस्तीच्या वेळी मोठा अपघात होऊन मनुष्यहानी होऊ शकते. ती टाळण्यासाठी चिपळूण शहरातील महामार्ग रुंदीकरणामुळे विस्थापित होणाऱ्या पाणीपुरवठा व वीजपुरवठा लाईनच्या कामांची त्रयस्त शासकीय संस्थेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भागवत यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com