सिंधुदुर्ग अधिकृत पहिला ‘एआय’ जिल्हा

सिंधुदुर्ग अधिकृत पहिला ‘एआय’ जिल्हा

Published on

75545

सिंधुदुर्ग अधिकृत पहिला ‘एआय’ जिल्हा

पालकमंत्री नीतेश राणे ः प्रशासन, ‘मार्बल’ यांच्यात सामंजस्य करार

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ ः जिल्हा प्रशासन आणि मार्बल कंपनी यांच्यात ‘एआय’बाबत सामंजस्य करार करण्यास राज्याच्या मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार आज सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अधिकृतरीत्या राज्यातील पहिला ‘एआय’ युक्त जिल्हा झाला आहे. यानंतर राज्यात जे जिल्हे ‘एआय’ करायचे असतील, त्यांना पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात याबाबत केलेल्या कामाचा अभ्यास करावा लागेल. हे आपल्या जिल्ह्यासाठी भूषणावह आहे, अशी माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.
जिल्हाधिकारी बैठक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री राणे बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, मार्बल कंपनीचे हर्ष पोतदार आणि साई कृष्णन आदी उपस्थित होते. बदली होऊन गेलेले या प्रकल्पाचे समन्वयक तथा अपर पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले ऑनलाईन सहभागी झाले.
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’युक्त जाहीर केला होता. आरोग्य, कृषी, पोलिस आणि आरटीओ हे चार विभाग एआय तंत्रज्ञानाला जोडले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मार्बल आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार करण्यासाठी मान्यता देण्याबाबत राज्याकडे प्रस्ताव दिला होता. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चस्तरीय समितीने बैठक घेत यासाठी मान्यता दिली आहे. ही मान्यता मिळाल्याने जिल्हा प्रशासनाला राज्यातील पहिला ‘एआय’ युक्त जिल्हा म्हणून मान्यता मिळाली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे.’’
...............
मंत्रिमंडळासमोर होणार सादरीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्गच्या धर्तीवर गडचिरोली ‘एआय’युक्त करण्याचे आदेश राज्याला दिले आहेत. यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे प्रशासन अभ्यासासाठी सिंधुदुर्गात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘एआय’बाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मी व जिल्हा प्रशासन याचे सादरीकरण करणार आहोत. अजून यात पाच विभागांचा समावेश करण्यात येणार आहे, असे श्री. राणे यांनी सांगितले.
.................
आता मिळणार जलद माहिती
जिल्हा प्रशासन आणि मार्बल यांच्यात ‘एआय’बाबत सामंजस्य करार झालेला नसल्याने हार्डवेअर उपलब्ध नव्हती. त्यामुळे माहिती अत्यंत धीम्या गतीने मिळत होती. मात्र, आता हार्डवेअर वापरता येणार असल्याने ‘एआय’ची माहिती जलद मिळणार आहे, अशी माहिती श्री. रावले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com