खांडेकर प्रतिष्ठानतर्फे
शिष्यवृत्तीचे वाटप

खांडेकर प्रतिष्ठानतर्फे शिष्यवृत्तीचे वाटप

Published on

खांडेकर प्रतिष्ठानतर्फे
शिष्यवृत्तीचे वाटप
वेंगुर्ले ः गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थी सहाय्यता निधी शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे शंकर कांबळी, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत ओटवणेकर, टांककर शेटये ट्रस्टचे जनार्दन शेटये, कॉलेजची माजी विद्यार्थिनी जिल्हा न्यायालय कर्मचारी एकादशी कोंबे, संस्था सचिव पी. एस. कौलापुरे, पदाधिकारी दिनकर नागवेकर, पी. एस. प्रभू, श्रीराम दीक्षित, मुख्याध्यापक मंगेश कांबळी, रेडी हायस्कूल मुख्याध्यापक सी. एम. जाधव, आरवली टांक हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. एल. जाधव आदी उपस्थित होते. यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले. प्रा. आर. आर. परब यांनी प्रास्ताविक केले. पी. एस. कौलापुरे यांनी स्वागत केले. दिलीप पणशीकर यांनी सूत्रसंचालन केले. पी. एस. कौलापुरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com