भाविकांच्या गर्दीत श्रीदेव भैरीची पालखी प्रदक्षिणा

भाविकांच्या गर्दीत श्रीदेव भैरीची पालखी प्रदक्षिणा

Published on

-rat५p२९.jpg-
२५N७५५३७
रत्नागिरी : ग्रामदैवत श्री देव भैरी पालखीची शनिवारी ग्रामप्रदक्षिणा झाली.
-rat५p३०.jpg-
२५N७५५३८
रत्नागिरी : वाद्यांचा गजर करताना फगरवठारमधील ग्रामस्थ. (मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
-----
भाविकांच्या गर्दीत श्रीदेव भैरीची पालखी प्रदक्षिणा
आषाढ दशमी; उत्सवात बारा वाड्यांतील ग्रामस्थांसह भाविकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : भाविकांच्या गर्दीत आणि अत्यंत उत्साही वातावरणात, पावसाच्या सरींमध्ये ग्रामदैवत श्री देव भैरीची आषाढ दशमीची पहिली ग्रामप्रदक्षिणा झाली. भैरीबावाने मानाच्या घरी सहाणेवर आणि ठरलेल्या मार्गाने जात ग्रामस्थांचे उलपे घेतले. भैरीचरणी लीन होण्याकरिता भाविकांची मार्गावर सर्वत्र गर्दी पाहायला मिळाली.
ढोलताशांच्या गजरात, वाजतगाजत श्री देव भैरीची पालखी सकाळी मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर आली. त्या वेळी भाविकांनी भैरी नावाचा गजर केला. त्यानंतर मंदिरातून पालखी खालचीआळीमार्गे मुरलीधर मंदिर, काँग्रेस भुवन, टिळकआळी, झाडगाव येथे पटवर्धन व सावंत (खोत) यांच्याकडे थांबली. पुढे जोशी पाळंदमार्गे परटवणे येथे खंडकर खोत यांच्याकडे थांबली. वाटेत अनेक ठिकाणी उलपे घेण्यासाठी पालखी थांबत होती. त्यानंतर फगरवठार येथील लांजेकर कंपाऊंडमधील सहाणेवर पालखी खांबली. अठराहाताच्या गणपती मंदिरमार्गे फाटक हायस्कूल, गाडीतळ, गोखलेनाका, मारुती आळी येथे आली. तेलीआळी कोतवडेकर सहाणेवर थांबून परत मारूतीआळीतून पऱ्याची आळी, धमालनीच्या पारावरून विठ्ठलमंदिरमार्गे, मुरलीधर मंदिर, खालची आळीमार्गे रात्री श्री देव भैरी मंदिरामध्ये पालखी पोहोचली. गाऱ्हाणे होऊन ग्रामप्रदक्षिणा कार्यक्रमाची सांगता झाली. या उत्सवात बारा वाड्यांतील सर्व गावकरी, मानकरी, ग्रामस्थ, भाविक आनंदाने सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com