कासार्डेत विठुरायाला चिमुकल्यांची हाक
75546
कासार्डे ः आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील माध्यमिक विद्यालयात ‘रिंगण सोहळा’ झाला.
75679
कासार्डे ः रिंगण सोहळ्यात सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी.
कासार्डेत विठुरायाला चिमुकल्यांची हाक
विद्यार्थ्यांची ‘आनंदाची वारी’; ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’चा गजर
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ६ : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रशालेच्या प्रांगणात ‘आनंदाची वारी’मध्ये अनोखा असा पालखीतील रिंगण सोहळा सादर करून पंढरीच्या पांडुरंगाला टाळ-मृदंगाच्या तालात साद घातली. हा रिंगण सोहळा आज उत्साहात पार पडला. ‘ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
या पालखीसोबत प्रशालेतील १०० पेक्षा अधिक मुले-मुली सहभागी झाली. पालखीचे भोई म्हणून राज कुडतरकर व अन्वेश नारकर यांनी कामगिरी बजावली. विठ्ठलाची भूमिका-मंथन ओटवकर, लक्ष्मण मेघारी, रखुमाई-मौर्वी महाडिक व गौरवी राणे तर राधा-कृष्ण-निधी मोरे, सिया कोनाडकर, संत मुक्ताबाई-सावी मुद्राळे, संत जनाबाई-वैदेही देवरुखकर, संत मीराबाई-वैष्णवी कातकर, बहिणाबाई-ऋतिका गोसावी, संत कान्होपात्रा-रक्षा देसाई, संत चांगुणा-स्वरा गिरी तर दिंडी चोपदार-वीर नकाशे, संत एकनाथ-स्वरुप कुंभार, सोपानदेव-आर्यन दराडे, नामदेव-उन्मेश कोकरे, संत तुकाराम-चैतन्य सावंत व निवृत्तीनाथ-अभिषेक देवरुखकर आदी विविध संतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. मृदंगमणी अश्मेश लवेकर व ओम ठुकरुल यांनी भूमिका पार पाडली.
या रिंगण सोहळ्यात पालखीतील विविध पारंपरिक वारकरी खेळांचे सुमारे २५ पेक्षा अधिक वारकरी बनलेल्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. निधी मोरे व सिया कोनाडकर यांनी ‘माझ्या डोईवर घागर भरली रे’ हे गवळण नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
विविध पारंपरिक खेळांमध्ये आणि रिंगण सोहळ्यात शिक्षकांचाही उत्साहपूर्ण सहभाग होता. मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे व ए. पी. घुले यांनी विद्यार्थ्यांना आषाढी वारीच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख रामचंद्र राऊळ, क्रीडा विभागप्रमुख दत्तात्रय मारकड, कला विभागाचे सागर पांचाळ, पाचवी वर्गशिक्षिका सोनाली पेडणेकर, मृण्मयी देवधर, तृप्ती कुडतरकर, वैष्णवी डंबे, प्रियंका सुतार, पूजा पाताडे, देवेंद्र देवरुखकर, विनायक पाताडे, यशवंत परब, मंदार नमसे आदींनी मेहनत घेतली. विद्यालयातील ८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळा आणि रिंगण सोहळ्याचा ‘याची देही याची डोळा’ अनुभवला घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.