प्रचंड लाटांमुळे टेट्रापॉड्स सरकण्याची शक्यता

प्रचंड लाटांमुळे टेट्रापॉड्स सरकण्याची शक्यता
Published on

लाटांमुळे ‘टेट्रापॉड्स’ सरकण्याची शक्यता
मिऱ्या बंधाऱ्याचे काम मजबूत ; पत्तनचा निर्वाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अजून अपूर्ण आहे. पावसाळ्याची परिस्थिती लक्षात घेता धोकादायक लांबीमध्ये प्रस्तावित ६ मीटर उंचीपैकी ३.५ मीटर उंचीपर्यंतचे काम टेट्रापॉड्स बसवून झाले आहे. अजून २.५ मीटर उंचीचे काम अद्याप बाकी आहे. सध्या पावसाळ्याच्या प्रचंड लाटांमुळे अर्धवट कामातील टेट्रापॉड्स सरकण्याची शक्यता आहे; परंतु ते पसरले नाहीत, असे पत्तन विभागाने स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी शहरानजीक मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा १९० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. मिऱ्या बंधाऱ्याच्या अपूर्ण राहिलेल्या १२०० मीटरच्या पांढरा समुद्र ते जयहिंद चौकापर्यंतच्या टप्प्यामध्ये काम सुरू आहे. पत्तन विभागाकडून केलेल्या सर्वेमधील सात डेंजर झोनपैकी फक्त एका टप्प्याचे काम बाकी आहे. पावसाळ्याची परिस्थिती लक्षात घेता धोकादायक लांबीमध्ये प्रस्तावित ६ मीटर उंचीपैकी ३.५ मीटर उंचीपर्यंतचे काम टेट्रापॉड्स बसवून झाले आहे. पावसाळ्याच्या अनुषंगाने दुरुस्तीच्या कामासाठी ठेकेदारामार्फत सर्व यंत्रणा सज्ज आहे तसेच दुरुस्तीचे व मूळ कामही सुरू आहे. सहा मीटर उंचीपर्यंतचे प्रस्तावित काम पूर्ण झाल्यानंतर तेथील बंधारा मजबूत होऊन तो लाटांचा मारा सहन करेल. सद्यःस्थितीत काम अर्धवट झालेले असल्याने टेट्रापॉड सरकले आहेत, असे दिसतात; परंतु पूर्ण सहा मीटर उंचीचे काम झाल्यानंतर ते हलणार नाहीत व सुरक्षित राहतील. हा बंधारा कोठेही खचलेला नाही, असे पतन विभागामार्फत सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com