दापोली-क्राईम
दोन दुचाकींच्या धडकेत दोघे जखमी
दापोली ः दापोली शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोर दोन दुचाकींच्या धडकेत समाधान जोशी (वय १८, रा. करजगाव) व वकास अब्दुल रऊफ मुजावर (वय २१, रा. बोरवली) हे दोघे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. समाधान जोशी याच्या जबड्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. वकास मुजावर याला प्रथम दापोलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले.
विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू
दापोली ः तालुक्यातील वडवली आदिवासीवाडी येथे ४ जुलैला विहिरीत पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. विठ्ठल निकम (वय ६५, रा. वडवली आदिवासीवाडी, ता. दापोली) असे त्यांचे नाव आहे. निकम हे रेशनकार्ड व आधार कार्डची झेरॉक्स आणण्यासाठी वडवली गावठाण येथे गेले होते. यावेळी ते पांढरे यांच्या घराच्या खालच्या बाजूला नैसर्गिक विधीसाठी गेले असता त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. यात त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तत्काळ उपचारासाठी दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दापोली पोलिसांनी या घटनेची नोंद अकास्मिक मृत्यू म्हणून केली असून, पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.