अक्षय मेस्त्रींनी घोंगडीवर साकारला श्री विठुराया
75551
अक्षय मेस्त्रींनी घोंगडीवर
साकारला श्री विठुराया
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ५ : गवाणे (ता. देवगड) येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी आषाढी एकादशी निमित्त शेतकऱ्याच्या घोंगडीवर विठुराया साकारला आहे. भव्य दिव्य हा विठुराया अनेकांचे लक्ष लेधत आहे.
शेतकरी आणि वारकरी घोंगडीचा सर्रास वापर करतात. त्या घोंगडीतून मिळणारी ऊब वेगळीच ऊर्जा देते. अप्रत्यक्षपणे विठू माऊली या घोंगडीतून वारकरी आणि शेतकरी यांच्यासोबत वास करत असतो, अशी कल्पना करून चक्क ७ फूट उंच आणि ४ फूट रुंद असा भव्य विठुराया अक्षय याने साकारला आहे. गवाणे येथील स्टुडिओमध्ये या विठुरायाचे दर्शन सर्वांसाठी खुले आहे. पाहणाऱ्याला साक्षात पांडुरंगाचे दर्शन घडविणारी ही सुंदर कलाकृती साकारली आहे. यापूर्वीही अक्षय यांनी अतिसूक्ष्म आणि अति भव्य असे वेगवेगळ्या माध्यमातून चित्रे साकारली आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले आहे. यावेळीही या अनोख्या विठ्ठल भेटीबद्दल वारकरी आणि विठ्ठल भक्तांनी त्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.