गांजा बाळगल्याप्रकरणी वेंगुर्लेजवळ एकाला अटक
75549
गांजा बाळगल्याप्रकरणी
वेंगुर्लेजवळ एकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ ः उभादांडा बागायतवाडी (ता.वेंगुर्ले) येथील कोठारेश्वर मंदिरासमोर सुमारे ११ हजार रुपये किंमतीचा गांजा वेंगुर्ले पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी येथीलच प्रसाद प्रकाश तुळसकर (वय ३२) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
याबाबत पोलिस हवालदार मनोज परुळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वेंगुर्ले बागायतवाडी कोठारेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर पेट्रोलिंग करताना गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई वेंगुर्ले पोलिस निरीक्षक निसर्ग ओतरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलिस हवालदार योगेश सराफदार, जोसेफ डिसोझा, योगेश राऊळ, पोलिस नाईक स्वप्नील तांबे, पांडुरंग खडपकर, मनोज परुळेकर, प्रथमेश पालकर, जयेश सरमळकर, महिला पोलिस गौरी ताम्हणेकर, होमगार्ड तेजस्वी धुरी यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.