बांद्यातून बुलेट चोरणाऱ्याला पकडले
75567
बांद्यातून बुलेट चोरणाऱ्याला पकडले
संशयित गोव्यातील; ‘एलसीबी’ची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः येथील बाजारपेठेतून बुलेट दुचाकी चोरणाऱ्या भुवन तिलकराज पिल्ले (वय १९, रा. म्हापसा-गोवा) या चोरट्याच्या मुसक्या सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आवळल्या. त्याला गोव्यातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एलसीबी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली हवालदार डॉमनिक डिसोजा, सदानंद राणे, बसत्याव डिसोझा व जॅक्सन घोणसालवीस यांनी शुक्रवारी (ता. ४) ही कारवाई केली.
बांदा पोलिस ठाण्यात रोहित श्रीकृष्ण काणेकर (रा. बांदा कट्टा कॉर्नर) यांच्या फिर्यादीनुसार, दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. काणेकर यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीची एमएच ०७ एएल ९४१० ही बुलेट दुचाकी ५ जूनला अज्ञाताने काणेकर यांच्या काकांच्या घरासमोरून चोरून नेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सीसीटीव्ही व मोबाईल क्रमांकाच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित भुवन पिल्ले याला कोलवाळे पोलिस ठाणे हद्दीत संशयास्पदरित्या फिरत असताना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. संशयित पिल्ले याला या गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने हा गुन्हा आपण व अन्य दोन साथीदारांनी मिळून केला असल्याचे सांगितले. या गुन्ह्यात चोरीस गेलेली बुलेट दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.