नवनवे उपक्रम राबवल्यास सिंधुदुर्गचा विकास सुनिश्चित
75678
नवनवे उपक्रम राबवल्यास
सिंधुदुर्गचा विकास सुनिश्चित
दीपक केसरकर ः पालकमंत्री सकारात्मक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः पालकमंत्री नीतेश राणे यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन दाखविला आहे. त्यांनी वाद निर्माण होऊ दिले नाहीत. एकत्र काम केल्याने जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास निश्चित होईल, असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. ‘केसरकर यांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे’ या पालकमंत्री राणेंच्या विधानाबाबत ते बोलत होते.
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘कोणत्याही जिल्ह्यात दोन कारागृह नाहीत. सिंधुदुर्गात गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ओरोस येथील कारागृह पुरेसे आहे. सावंतवाडीतील कारागृह १५० वर्षांपूर्वीचे आहे. त्यामुळे ‘जेल टुरिझम’ची संकल्पना येथे राबविली जाऊ शकते. पर्यटकांना वेगळा अनुभव आपण देऊ शकतो. पहिले जेल टुरिझम सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकते. दुर्दैवाने अपघात झाला. मात्र, सर्व कैदी ओरोसला हलविले आहेत. त्यामुळे सावंतवाडी कारागृह पर्यटनासाठी वापरावे. सावंतवाडीला मोठा ऐतिहासिक वारसा असल्याने नावीन्यपूर्ण पर्यटन उपक्रम सुरू झाले तर त्याचा फायदाच होईल.’’
ते म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे हे फतव्याच्या मतांवर अवलंबून आहेत. त्यांना राज ठाकरे हिंदुत्व शिकवतील. मात्र, राज ठाकरेंवर पुन्हा अन्याय होणार नाही, ही अपेक्षा आहे. ‘यूज ॲण्ड थ्रो’ ही उद्धव ठाकरेंची नीती असून याचा अनुभव मी घेतला आहे. महाराष्ट्रात हाणामाऱ्या, भांडणे नको, अशी अपेक्षा आहे. मराठीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड झालेली नाही.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.