ठाकरे शिवसेना-मनसेचा जल्लोष

ठाकरे शिवसेना-मनसेचा जल्लोष

Published on

75670

ठाकरे शिवसेना-मनसेचा जल्लोष

सावंतवाडीत आतषबाजी; ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा आनंद

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः राज्याचा हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्यावर मराठी माणसांचा विजय म्हणून वरळी डोममध्ये कार्यक्रम पार पडला. दोन ठाकरे बंधू तब्बल २० वर्षांनी एकत्र येत दोघांनीही दमदार भाषणे केली. यानंतर सिंधुदुर्गात सावंतवाडीत ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासाची ही नांदी आहे. राज्याच्या एकजुटीसाठी आम्ही जल्लोष साजरा करत असल्याची भावना ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली. मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी, मुंबईत मराठी माणूस आज एकत्र झाला. सिंधुदुर्गातही आज ते झाले आहे. मराठी माणसाच्या वाटेला कोणी गेलं की तो कसा पेटतो, ते आज कळलं असेल, असे मत व्यक्त केले. मराठी जनांचा हा आनंद दिवस आहे. बाहेरील शक्ती राज्यात अतिक्रमण करू पाहता असताना मराठी मनाचा विचार करून ठाकरे बंधू एकत्र आल्याची प्रतिक्रिया ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोझा व्यक्त केली.
ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख राऊळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. केसरकर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख डिसोजा, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, सावंतवाडी शहर अध्यक्ष ॲड. राजू कासकर, कट्टर शिवसैनिक शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, आशिष सुभेदार, राजन पवार, रमेश गावकर, मळगाव विभाग अध्यक्ष राकेश परब, मिलिंद देसाई, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष अतुल केसरकर, सिद्धेश आखेरकर, दिनेश मुळीक, श्रीराम सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com