सावंतवाडीत शालेय वारकऱ्यांची मांदियाळी

सावंतवाडीत शालेय वारकऱ्यांची मांदियाळी

Published on

75671

सावंतवाडीत शालेय वारकऱ्यांची मांदियाळी

दिंडी सोहळा उत्साहात; विठ्ठल मंदिरात हरिनामाचा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला येथील संस्थानकालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात शाळकरी मुलांनी एक अभूतपूर्व ‘मांदियाळी’ भरवली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशभूषा करत दिंडी, पालखी सोहळ्यामध्ये भाग घेतला आणि विठ्ठल नामाच्या गजराने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या सोहळ्यामध्ये माठेवाडा अंगणवाडीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या बालकांचाही सहभाग होता, ज्यामुळे या कार्यक्रमाला एक विशेष रंगत आली. शहरातील चारही दिशांमधील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या विठ्ठल दिंडीमध्ये सहभागी झाले. लहान मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते, तर लहान मुलगे वारकऱ्यांच्या वेशात डोक्यावर टोपी आणि हातात भगवा ध्वज घेऊन आपल्या शाळेतून पालखीसोबत विठ्ठल मंदिरात सकाळीच दाखल झाले. अंगणवाडी क्रमांक १५ मधील समर्थ काष्टे याने विठोबाची आणि जीविका कदम हिने रखुमाईची वेशभूषा केली होती. या विठोबा-रखुमाईने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या दिंडीमध्ये माठेवाडा अंगणवाडी क्रमांक १५ सह सुधाताई वामनराव कामत प्राथमिक शाळेतील विद्यार्थीही सहभागी झाले. कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि अटल प्रतिष्ठानमधील विद्यार्थ्यांनीही शिक्षकांनी धरलेल्या गोल रिंगणात ताल धरला.
या उपक्रमात माठेवाडा सुधाताई वामनराव कामत प्रशालेच्या मुख्याध्यापिका भक्ती फाले, शिक्षिका प्राची ढवळ, हेमांगी जाधव, पूजा ठाकूर, भावना गावडे, रंजित सावंत, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर आणि पालक नेहा काष्टे, पूजा गावडे, शिवानी तुयेकर, जान्हवी गावडे, आर्या मुंज, तेजस्विनी चव्हाण, स्वानंदी नेवगी, सानिका मातोंडकर, सौ. नाईक, खुशी पवार आदी सहभागी झाले होते.
गीतांश मुंज, सावी नेवगी, गंधार नाईक, युवराज चव्हाण, कबीर परब, रुद्र मिसाळ, दुर्वा गावडे, अथांग मातोंडकर, सार्थक नेवगी, बिहान मडगावकर, अलिशा दापले आदी चिमुकल्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com