आंदुर्ले ग्रामपंचायतीतर्फे भात लागवड प्रात्यक्षिक

आंदुर्ले ग्रामपंचायतीतर्फे भात लागवड प्रात्यक्षिक

Published on

swt65.jpg
75674
आंदुर्ले ः ग्रामपंचायतीच्या वतीने कृषी दिन साजरा करण्यात आला.

आंदुर्लेत भात लागवड प्रात्यक्षिक
कुडाळः आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील प्रगतशील शेतकरी मंगेश भाईप, गणपत येरम, रवींद्र मयेकर यांचा या निमित्ताने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. गावातील मुणगी स्मशानभूमी येथे सागाची रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेतीशाळेमध्ये भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. अशाप्रकारे विविध उपक्रमांद्वारे आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकिसन मोर्ये, अनुराधा साळगावकर, स्मिता पिंगुळकर, अनिल भगत उपस्थित होते.
................
swt66.jpg
75675
बांदा ः वायरमन अमित वाघाटे यांचा सत्कार करताना बांदा भाजपचे पदाधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यात भाजपतर्फे वाघाटेंचा सत्कार
बांदाः शहरातील ग्राहकांच्या विजेच्या समस्या कर्तव्यदक्ष राहून तत्काळ सोडविणारे त्याचप्रमाणे प्रामाणिक आणि निःस्वार्थी भावनेने जनसेवा करणारे महावितरणचे वायरमन अमित वाघाटे यांची लाईनमन म्हणून कणकवली येथे नियुक्ती झाली. त्यांच्या प्रामाणिक कार्याबद्दल भाजप बांदा शहरतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादू कविटकर, भाजपा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, बांदा उपसरपंच राजाराम धारगळकर, शहर उपाध्यक्ष शैलेश केसरकर, रत्नाकर आगलावे, सिद्धेश महाजन, बंड्या गिरप, संदीप बांदेकर, संदेश सातार्डेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com