पर्यटन समस्या सोडविण्याचे प्रयत्न

पर्यटन समस्या सोडविण्याचे प्रयत्न

Published on

75666

पर्यटन समस्या सोडविण्याचे प्रयत्न

शंभूराज देसाई ः सिंधुदुर्गप्रश्नी बाबा मोंडकर यांना ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतराष्ट्रीय सी-वर्ल्ड प्रकल्प सुरू करावा तसेच पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडवाव्यात, अशा मागण्या भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. पर्यटन क्षेत्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी सरकार सकारात्मक असून याविषयी मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेऊन मार्ग काढू, अशी ग्वाही श्री. देसाई यांनी दिल्याची माहिती श्री. मोंडकर यांनी दिली.
श्री. मोंडकर यांनी पर्यटनमंत्री देसाई यांची भेट घेऊन पर्यटनविषयक विविध समस्यांबाबत लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. या व्यवसायवृद्धीसाठी अडचणी दूर करणे आवश्यक आहे. न्याहारी निवास धारकांची ऑनलाईन प्रकिया सुलभ हावी, न्याहारी निवासधारकांकडून नोंदणी शुल्क न घेता बुकींगवर कमिशन घ्यावे, २० वर्षांत एकही बुकींग निवासधारकांना पर्यटन महामंडळाकडून मिळाले नाही यात बदल व्हावा तसेच पर्यटन महामंडळाची स्वतःची निवास व्यवस्थाचे बुकींग झाल्यावर निवास धारकांना बुकिंग मिळावे, कोकणातील आंबे, काजू, सुपारी शेती क्षेत्राचा विचार करता कृषी पर्यटन प्रकल्प मर्यादा ४० गुंठे वरून कमीत कमी १० गुंठे वर आणावी, कोकणातील नगरपालिका, नगरपंचायत कार्य क्षेत्रात कृषी पर्यटन प्रकल्पास मान्यता द्यावी, हॉटेल व्यवसायाला उद्योग दर्जा असल्याने वीज आकारणी ओद्योगिक दराने करावी, कोकणातील जलपर्यटन मुदत दरवर्षी १० जून पर्यंत करावी, कोकणातील धरण, नदी, तलाव क्षेत्रात जलपर्यटन व्यवसायास बारमाही परवानगी द्यावी, पर्यटन व्यवसाय परवानगी जिल्हास्तरावर एक खिडकी पद्धतीने द्यावा, कोकणातील कातळशिल्पे पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आवश्यक सुविधा कराव्या, कोकणातील गड किल्ले पुनर्जीवित करून पर्यटनवृद्धीसाठी नियोजन करावे, कोकणातील ब वर्ग, क वर्ग पर्यटन निधीतुन खर्च झालेली मंदिरे धार्मिक पर्यटनस्थळे म्हणून पर्यटकांपर्यंत पोहचविण्यासाठी पॉलिसी बनवावी, गोव्याच्या धर्तीवर टू व्हीलर व्यवसायाला पर्यटनवृद्धीसाठी वाहतूक परवाना द्यावा, कोकणातील स्थानिक संस्कृती, कला, दशावतार पर्यटकांपर्यंत पोहचण्यासाठी कल्चर सेंटर उभारावे, कोकणात पर्यटनपूरक प्रकल्प उभारणीसाठी अनुदान द्यावे, पर्यटन संचानालय कोकण विभागासाठी जिल्हास्तरीय अधिकारी नियुक्त करावा, कोकणातील गडकिल्ले, बीच, ऍग्रो, हिस्ट्री, कल्चर, मेडिकल, हिल, जंगल, कांदळवन सफर जलपर्यटन, साहसी पर्यटन प्रकल्पची गाव निहाय यादी करून सरकारी वेब पोर्टलवर प्रसिद्धी द्यावी, कोकणातील समुद्र किनारी असलेल्या सरकारी शेरे जमीन पर्यटन व्यवसायासाठी देण्याची पॉलिसी बनवावी, कोकण पर्यटन विकास आराखडा बनवावा, आदी मागण्या श्री. मोंडकर यांनी पर्यटनमंत्री देसाई यांच्याकडे केल्या. सी-वर्ल्ड प्रकल्प व पर्यटन क्षेत्रातील समस्या निवारण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com