साळीस्तेत लक्षवेधी पालखी सोहळा
75668
साळीस्तेत लक्षवेधी पालखी सोहळा
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ६ ः आषाढी एकादशीचे औचित्य साधून साळिस्ते क्रमांक १ शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेला पालखी सोहळा लक्षवेधी ठरला.
या वारीमध्ये संत तुकाराम यांचे अभंग व त्याचा अर्थ सांगण्यात आला. टाळ मृदंगांच्या गजरात विद्यार्थ्यांनी रिंगण करून नृत्य सादर केले. विठ्ठल व रुक्मिणी यांचीही प्रमुख वेशभूषा लक्षवेधी ठरली. यामध्ये विठ्ठल-समर्थ सुतार तर रुक्मिणी - सई बारस्कर हिने साकारले. गावामध्ये वारीची फेरी काढली. सर्व वारकरी विद्यार्थ्यांनी अनवाणी चालून विठुरायाचा जयघोष केला. हा पालखी सोहळा पाहण्यासाठी सरपंच प्रभाकर ताम्हणकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर, उपाध्यक्ष गजानन रामाणे, रिया चिके, स्वरूपा चिके, शितल दळवी, अंगणवाडी सेविका दिपाली गुरव, मदतनीस समिक्षा गुरव आदी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी पदवीधर शिक्षक सीताराम पारधिये, उपशिक्षक माधवी बुचडे, संगिता वळवी यांनी विशेष मेहनत घेतली. मुख्याध्यापक संजना ठाकूर यांनी वारीचे महत्त्व सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.