कंत्राटदारांची थकीत देयके तातडीने देण्याची मागणी
75689
कंत्राटदारांची थकीत देयके
तातडीने देण्याची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांना साकडे ः संघटनेचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना राज्यभर आक्रमक झाली असून सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. कंत्राटदारांची देयके तातडीने देण्यात यावीत, अशी प्रमुख मागणी या वेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जिल्ह्यातील कंत्राटदारांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी दालनात यावेळी मक्तेदारांचे विषय समजून घेतले व सकारात्मक प्रतिसाद देत केलेल्या मागण्यांचे निवेदन तातडीने सरकारला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी कंत्राटदारांच्या विशेष करून निधीच्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष उदयकुमार पाटील, जलजीवन मिशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप सावंत, सुशिक्षित बेकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुभम वैद्य यांनी कंत्राटदारांचे प्रश्न मांडताना कामाची देयके मागील दीड वर्षापासून प्रलंबित असल्याचे सांगितले. कंत्राटदार हा बँक व खासगी सावकार यांच्याकडून घेतलेल्या कर्जात बुडाला आहे. तसेच पुरवठादारांचे व कामगारांचे मानधन देऊ शकत नाही. यामुळे जोपर्यंत केलेल्या कामांचा निधी येत नाही, तोपर्यंत कामे बंद ठेवणार असल्याचे सांगितले. या बैठकीत संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष विलास गवस, बिपिन कोरगावकर, प्रदीप सामंत, गुरुप्रसाद तवटे, महेंद्र माणगावकर, सागर माळवदे व बहुसंख्य कंत्राटदार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.