सिंधुदुर्गनगरीत पालकमंत्री कक्ष
75690
सिंधुदुर्गनगरीत पालकमंत्री कक्ष
समस्या जाणणार; नागरिकांकडून निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ६ ः सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना केली आहे. आज या कक्षात पालकमंत्री नीतेश राणे यांना विविध क्षेत्रातील स्थानिक समस्यांबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री यांनी तक्रारी, निवेदने आणि समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी व्यक्तीशः संवाद साधला, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पीक नुकसान, वीजेची समस्या, साकव पुलाची मागणी, तांडा वस्ती सुधार योजनेची कामे, वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती, रुग्णवाहिका चालकांच्या समस्या, पी.एम. विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणे, जिल्हा परिषदेतील पद भरती, रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण अशा विविध विषयांवरील निवेदनांवर पालकमंत्री राणे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी स्वीकारल्या. पालकमंत्री यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन आले होते. श्री. राणे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.