वेंगुर्लेत शुक्रवारपासून अखंड भजनी सप्ताह
वेंगुर्लेत शुक्रवारपासून
अखंड भजनी सप्ताह
वेंगुर्ले, ता. ६ ः श्री देव रामेश्वरचा अखंड भजनी सप्ताह ११ ते १८ जुलै या कालावधीत भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळी ९ वाजता पारंपरिक पद्धतीने सप्ताहाची सुरुवात होईल. दररोज अष्टोप्रहर भजने, सायंकाळी ६ ते १० या वेळेत निमंत्रित संगीत व वारकरी भजने, रामेश्वर मंदिरात पौराणिक कथांवर आधारित देखावे, स्थानिक कलाकारांची रांगोळी प्रदर्शने होतील. तसेच १७ ला रात्री १२ वाजता दिंडी कार्यक्रम, १८ ला सकाळी १० वाजता रामेश्वर पालखी प्रदक्षिणा होईल. यावेळी भक्तांकडून पालखीवर लाडवांचा वर्षाव, दुपारी १२ वाजता काल्याने सप्ताहाची सांगता, त्यानंतर गावाच्या कल्याणासाठी सामूहिक गाऱ्हाणे असे कार्यक्रम होणार आहेत. या सप्ताहाच्या निमित्ताने श्रींच्या दर्शनाचा तसेच कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, वेंगुर्लाच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
देवलीत बुधवारपासून
रबरबॉल क्रिकेट स्पर्धा
मालवण, ता. ६ ः देवली गाव आयोजित मर्यादित षटकांची ''एक गाव एक संघ'' पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धा ९ ते १३ जुलै या कालावधीत देवली येथील गवळदेव मैदान येथे होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास २५ हजार रुपये, उपविजेत्या संघास १५ हजार रुपये व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.