रत्नागिरी-पानवलच्या ''एक्सपायरी डेट''ची बाजी

रत्नागिरी-पानवलच्या ''एक्सपायरी डेट''ची बाजी

Published on

rat6p32.jpg-
75753
रत्नागिरी ः भाटकर स्मृती स्पर्धेतील विजेत्या पानवलच्या नाटकाच्या संघासोबत मान्यवर.
------------
रमेश भाटकर स्मृती नाट्यस्पर्धा - लोगो

पानवलच्या ‘एक्सपायरी डेट’ची बाजी
‘मी तर बुवा अर्धा शहाणा’ द्वितीय ; गणेश नाट्यमंडळाचे मोरुची मावशी तृतीय
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ः येथील अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे घेण्यात आलेल्या (कै.) नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्यस्पर्धेत पानवल-घवाळीवाडी येथील इंद्रधनू प्रतिष्ठानचे नाटक एक्सपायरी डेट या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेला (कै.) गणपत तथा दादा लोगडे स्मृती रोख रक्कम ३० हजार व (कै.) नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती भाटकर कुटुंबीयांकडून ११ हजार रुपये असे एकूण ४१ हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
ग्रामीण व शहर भागात झालेल्या ४७ नाटकांचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी येथील स्वातत्र्यवीर वि. दा. सावरकर नाटयगृहात झाला.
या वेळी पालकमंत्री उदय सामंत, माजी न्यायाधीश श्रीमती मृदूल रमेश भाटकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे, नाट्य परिषद कार्याध्यक्ष समीर इंदुलकर आदी उपस्थित होते.
नाट्य स्पर्धेचा निकाल असा ः इंद्रधनू प्रतिष्ठान- एक्सपायरी डेट, नुतन बालमित्र बोरकर नाट्य मंडळ वरवडेचे ''मी तर बुवा अर्धा शहाणा'' हे नाटक द्वितीय, गणेश प्रासादिक नाटयमंडळाच्या मोरुची मावशीने तृतीय क्रमांक मिळावा. द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या नाटकांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले. उत्तेजनार्थ पाच नाटकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात. त्यामध्ये आगवे ग्रामस्थ मंडळ, (कै.) प्रभाकर भोळे स्मृती कलामंच काळबादेवी, पावणादेवी कला उत्कर्ष मंडळ देऊड, आदित्यनाथ व्याडेवश्वर ब्रह्मवृंद नाट्य मंडळ, श्री देव गांगेश्वर नाट्य समाज कोळंबे या मंडळांना गौरविण्यात आले.
----
चौकट
सर्वोत्कृष्ट विजेते असे....
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - प्रशांत घवाळी, दशरथ कीर, गजानन जोशी.
* सर्वोत्कृष्ट अभिनेता- आदित्य बापट, गौरव फडके, कैलास दामले
* सर्वोत्कृष्ट तांत्रिक अंगे- श्री देव गांगेश्वर नाट्य समाज कोळंबे, अक्षय थिएटर्स रत्नागिरी, श्री खंडाळेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ खंडाळा
* सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रेय शेट्ये, नारायण दामले, सार्थक धामणस्कर.
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- रक्षिता पालव, ज्योती निमसे, अमिषा देसाई.
* सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका- सुभाष शिवलकर, दीपक घवाळी, प्रसन्न जोशी.
------------
कोट
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा नाट्य परिषदेने यशस्वी केली याचे समाधान आहे. रत्नागिरी ही कलाकारांची खाण आहे. या स्पर्धेतून अनेक कलाकार मिळाले असून व्यावसायिक रंगभूमीसाठी तयार झाले आहेत. यापुढे ४७ नाटक अथवा ४७० नाटक होऊ देत. त्या सर्वांचे तीन तासांचे रेकॉर्डिंग करावे. जेणेकरुन ही नाटके चॅनेलवर दाखवता येतील.
- उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com