खेड-नांदगावातील घर उभारणीसाठी जेसीजचा मदतीचा हात

खेड-नांदगावातील घर उभारणीसाठी जेसीजचा मदतीचा हात

Published on

rat6p19.jpg-
75692
खेड ः घरासाठी पत्रे प्रदान करताना जेसीज पदाधिकारी.
-----------
नांदगावातील घर उभारणीसाठी
जेसीजचा मदतीचा हात
खेड, ता. ४ : मुंबईमध्ये नोकरीनिमित्त राहणारे श्री. खोपटकर हे आपल्या मूळगावी होळी सणानिमित्त आले होते. ते घरी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या घरामध्ये शॉर्टसर्कीट होऊन नांदगाव जाखलवाडीतील खोपटकर याचे संपूर्ण घर बेचिराख झाले. खेड जेसीआयने याची तातडीने दखल घेत त्या कुटुंबातील सदस्यांना आधार दिला.
त्यावेळी जेसी आय खेडचे अध्यक्ष अमर दळवी, झोन ११ चे माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर, प्रथमेश खामकर, प्रमोद कांबळे, कपिल कोळेकर यांनी भेट दिली. त्यावेळी घरावर लागणारे पत्रे हे जेसीआय खेड देईल असा शब्द दिला होता. त्याची पूर्तता करण्यात आली. यावेळी जेसी अमर दळवी, अमोल क्षीरसागर, दीपक नलावडे, आनंद कोळेकर, अमित गरुड, मधुर पेठे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com