रत्नागिरी- युवा शक्तीला संधी देण्याची ताकद सहकारात

रत्नागिरी- युवा शक्तीला संधी देण्याची ताकद सहकारात

Published on

rat6p37.jpg-
75758
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना अॅड. दीपक पटवर्धन. डावीकडून श्रीराम भावे, डॉ. सोपान शिंदे आणि जानकी घाटविलकर.

युवा शक्तीला संधी देण्याची ताकद सहकारात
अॅड. दीपक पटवर्धन; आंतरराष्ट्रीय सहकार दिन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : भांडवलशाही अर्थव्यवस्थेसमोर जनसामान्यांनी उभी केलेली ताकद म्हणजे सहकार. सहकारामध्ये युवा पिढीसाठी रोजगार, व्यापारी, नेतृत्वाच्या संधी आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अमित शहा यांना सहकारमंत्री केल्यानंतर ग्रामीण भागातील सहकारी संस्थाना नवी दिशा प्राप्त होत आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण गतिमान करण्याच्या मोठ्या संधी सहकारात आहेत. त्या शोधून युवकांनी सहकार चळवळीत सहभागी होऊन नवतंत्रज्ञानाची साथ घेत विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रगती साधायला हवी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त सहकारातील संधी या विषयावर विविध शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. हा उपक्रम अॅड. दीपक पटवर्धन आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय संयुक्तपणे राबवत आहेत. भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आणि मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर उपस्थित होत्या. युवा पिढीला सहकार चळवळीची माहिती होण्याकरिता व सहकारातील संधीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. अॅड. पटवर्धन म्हणाले की, सहकार चळवळ ही लोकांनी लोकांसाठी चालवलेली लोकशाही कार्यपद्धतीनुसार चालणारी व्यवस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com