शाळांमध्ये आषाढी वारी उत्सव
rat6p3.jpg-
75622
रत्नागिरी : ल. ग. पटवर्धन विद्यामंदिरात आषाढी वारीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी यांच्यासमवेत पारंपरिक वेशभूषेत सजलेले वारकरी.
---------
पटवर्धन विद्यामंदिरात वारकरी दिंडी
रत्नागिरी: आषाढी एकादशीनिमित्त माळनाका येथील (कै.) ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात भक्तिमय आणि उत्साही वातावरणात वारकरी दिंडीचा कार्यक्रम पार पडला. विठ्ठल रुक्मिणीसोबत पारंपरिक वारकरी वेशभूषेत विद्यार्थी सजले. विठ्ठल नामाचा गजर करत, टाळ मृदुंगाच्या तालावर अभंग आणि भजने गात शालेय परिसरातून दिंडी काढण्यात आली. फुगड्या, रिंगण, विविध पारंपरिक खेळ खेळून विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद अनुभवला. प्रत्येक वर्गात अभंग, गाण्याच्या तालावर वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी फेर धरला. यानिमित्ताने मुलांमध्ये भक्तीभाव, सामाजिक समता आणि सांस्कृतिक परंपरा जतन करण्याची जाणीव जागृती झाली. मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांनी मार्गदर्शन केले. शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
---------------
rat6p18.jpg-
75691
सावर्डे ः दिंडीत सहभागी झालेले विद्यार्थी व शिक्षक.
--------
माखजन मराठी शाळेत दिंडी
सावर्डे ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. दिंडीत शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषेत विठुरायाच्या गजरात विठोबा मंदिरात घेऊन गेले. मराठी शाळा ते विठोबा मंदिर अशी पायी दिंडी काढून विठोबा मंदिरात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर केला. फुगड्या घातल्या. पारंपरिक वेशभूषेत नटून, थटून दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या वेळी केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड, मुख्याध्यापिका कल्पना नांदिवडेकर, मितेश पळे, सुप्रिया जाधव, रवींद्र घाणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शामल सागवेकर, उपाध्यक्ष संतोष धामणाक आदी उपस्थित होते.
-----
rat6p20.jpg-
75693
पावस ः पूर्णगड शाळेत आषाढी एकादशीनिमित्त आयोजित दिंडीत सहभागी विद्यार्थी.
-----------
पूर्णगड शाळेत दिंडी
पावसः रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. सुरवातीला वृक्षदिंडी, पर्यावरण जागृती घोषणा, वृक्षारोपण असे उपक्रम झाले. त्यानंतर वारकरी दिंडी यांचे काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक विठू नामाच्या गजरात तल्लीन झाले. विद्यार्थ्यांनी केलेली वारकरी वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. उपक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका भारती तायशेटे, शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
----
rat6p28.jpg-
75701
पाली ः नाणीजक्षेत्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज इन्स्टिट्यूटमध्ये काढण्यात आलेली बालचिमुकल्यांची दिंडी.
---------
नरेंद्र महाराज इन्स्टिट्यूटमध्ये दिंडी सोहळा
पाली ः येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी प्रशालेच्या बालचिमुकल्यांनी आषाढीवारी दिंडी सोहळा साजरा केला. यावेळी मुलांनी रिंगण, फुगडी, करवत कणा, अभंग गायन असे कार्यक्रम केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुमाता सौ. सुप्रियाताई, मुख्याध्यापिका डॉ. अबोली पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन केले. पालखीचे पूजन करून टाळ-मृदंगाच्या गजराच्या दिंडीचे प्रथम मुख्य मंदिराकडे झाले. बालचिमुकले विठ्ठल- रुखुमाई, महाराष्ट्रातील विविध संतांच्या वेशभूषा करून दिंडीत सहभागी झाले होते. प्रशालेमधून निघालेली दिंडी विठ्ठलाच्या नाम घोषात मुख्य मंदिरात नेण्यात आली. तेथे दिंडीचे स्वागत करण्यात आले. मंदिरात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे अभंग सादर केले. ध्वज पताकांचे अनोखे प्रदर्शन, मुलांनी फुगडी, काटवट कणा हे खेळ खेळले. त्यानंतर संत गोरा कुंभारांची एक अप्रतिम नाटुकली विद्यार्थ्यांनी केली.
------
rat6p2.jpg-
75621
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरात आषाढी दिंडीत संतांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी बालदोस्त.
------------
बियाणी बालमंदिरात आषाढी दिंडी
रत्नागिरीः भारत शिक्षण मंडळाच्या गो. भ. बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम रंगला. बालगोपाळांची वारकरी दिंडी काढण्यात आली. मैदानामध्ये रिंगण करून विठ्ठलाच्या नामघोषात दिंडीचा सर्वांनी आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी संत परंपरा साकारली. विठोबा- शिवांश भरणकर, रुक्मिणी- क्रिष्णा बनप, विठोबा- देवांग पटवर्धन, निवृत्ती- सोहम जोशी, ज्ञानेश्वर - आत्रेय तोंडवळकर, सोपान -गौरांग जुवेकर, मुक्ताई- आरोही कांबळे, जनाबाई- स्मरणिका नागले, नामदेव -सक्षम पेडणेकर, भटजी- प्रियांश मुळे तुकाराम- शौर्य पाटील या सर्व बालकांचे व त्यांच्या पालकांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. शालेय समितीचे अध्यक्ष दादा कदम, प्रबंधक विनायक हातखंबकर, सदस्य श्री. चव्हाण, श्री. कुष्टे, सतीश दळी, गुरुवर्य (कै.) अच्युतराव पटवर्धन यांचे सुपुत्र रमेश पटवर्धन, मुख्याध्यापिका धनश्री मुसळे व शिक्षिका, ताई आदी उपस्थित होते.
-------
जीजीपीएसमध्ये आषाढीनिमित्त दिंडी
रत्नागिरी : बालदोस्तांना विठुराया आणि आषाढी वारीचे महत्त्व कळावे यासाठी जीजीपीएसच्या स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी विभागाने आपल्या चिमुकल्यांसोबत आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. वारकऱ्यांची वेशभूषा करून आणि विठ्ठलाची पालखी घेऊन चिमुकल्यांनी विठुरायाच्या जयघोषात दिंडी काढली. विठ्ठलाच्या अभंगावर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता. विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभागी झाल्या. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर, प्री-प्रायमरी विभागाच्या प्रमुख शुभदा पटवर्धन उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.