आचरा क्र. ३ केंद्रशाळेत दिंडी

आचरा क्र. ३ केंद्रशाळेत दिंडी

Published on

75761

आचरा क्र. ३ केंद्रशाळेत दिंडी
आचरा, ता. ६ ः टाळमृदंगाचा गजरात विठ्ठल रखुमाईसह अवघे वारकरी मिळून निघालेल्या केंद्रशाळा आचराच्या मुलांनी काढलेल्या पायी वारी फेरीमुळे परिसर भक्तिमय बनला. विद्यार्थ्यांना आषाढी वारीचा अनुभव मिळावा, या दृष्टीने केंद्रशाळा आचरा क्र. ३ तर्फे केंद्रशाळा ते आचरा तिठा दरम्यान दिंडी काढली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या दिंडीचे आचरा तिठ्यावर सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी स्वागत केले. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा अर्पिता घाडी, उपाध्यक्षा अर्पिता घाडी, पालक देवेंद्र नलावडे, भालचंद्र घाडी, महेश मेस्त्री, मंगेश मेस्त्री, पंकज घारे, महेश पुजारे, विलास आचरेकर, पंच सदस्य किशोरी आचरेकर, राजेंद्र गाड, मुख्याध्यापिका अनिता पाटील, शिक्षक शारदा बिसेन, दीपाली खंडगावकर, मीरा बांगर, सिद्धेश हळवे, महेश चव्हाण,अंगणवाडी सेविका उषा चव्हाण, काकड आरती कार्तिकोत्सव मंडळाच्या लता घाडी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com