-दुर्मिळ सुगंधी बासमती
जपुया बीज वारसा---------लोगो
(१ जुलै पान २)
तांदूळ म्हटल्यावर सर्वात प्रथम विचार येतो तो बासमतीचा! बासमती ही अत्यंत दुर्मिळ सुगंधी जात. भारत आणि पाकिस्तानातील पंजाब प्रातांत हिमालयाच्या पायथ्याशी एका विशिष्ट भागात पारंपरिक पद्धतीने बासमती पिकवला जातो. सडपातळ, लांब दाणा आणि शिजून रेशमी सळसळीत मोकळा होणारा हा भात अप्रतिम चव आणि वैशिष्ट्यपूर्ण गंध यामुळे जगप्रसिद्ध आहे....!
- rat7p3.jpg-
25N75901
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टिज्ञान संस्था
----
दुर्मिळ सुगंधी बासमती
भारतात केवळ बासमतीच नाही तर रंग, गंध आणि चव यांचे वैविध्य असलेल्या इतरही स्थानिक प्रजातींचे आणि त्यांच्या उपप्रजातींचे तांदूळ आहेत. महाराष्ट्रात आंबेमोहोर, जीआय टॅग मिळवलेला इंद्रायणी, गंधसाळ, जीरेसाळ, रक्तसाळ, झिणी, जिरगा, मोगरा, तुमसर, कर्जत, पनवेल हे सुगंधी आणि स्वादिष्ट तांदूळ आहेत. गुजरातचे सोनामसुरी, कोलम, जॅस्मिन, परिमल तर बिहारचे पटना, कतरनी, तुलसी मंजिरी, अग्रसाली, बादशाह भोग या तांदळाच्या प्रजाती आढळून येतात. आसाममध्ये हलदी धान, सुपारी धान, मायेर धान, बेत्रा धान, पत्रा धान, उमरिया चुरी, लिम चुरी, आसाम चुरी, बागुरी चुरी असे तांदळाचे अनेक स्थानिक वाण आहेत. त्यात वैशिष्ट्यपूर्ण आणि जीआय टॅग मिळवलेला तांदूळ आहे, तो म्हणजे बोका धान (वेडा भात). एकेकाळी अहोम सैनिकांचे अन्न असलेला बोका धान ५० ते ६० मिनिटे पाण्यात भिजत ठेवला की, भात तयार होतो. आसामच्या डोंगराळ भागांत राहणारे आदिवासी आजही हा तांदूळ पिकवतात. या तांदळात मोठ्या प्रमाणावर तंतूमय पदार्थ आणि प्रथिने असतात.
बंगालमध्ये गोविंदभोग, लक्ष्मीभोग, कटारी भोग, राधा तिलक, हरीनाखुरी, राधुनी पागोल म्हणजे रांधणाऱ्याला वेड लावणारा अशा तांदळाच्या विविध प्रजाती आहेत तर मध्यप्रदेशच्या कालीमूछ, पिली लुचाई, जानकी, उरय बुटा, काकेरी, चिपडा, साठिया, जिरा शंकर, बदरफूल, झोराई या तांदळाच्या प्रजाती प्रसिद्ध आहेत. छत्तीसगढमध्ये विष्णूभोग, शीतलभोग, गंगाप्रसाद, जटाशंकर, आत्मशील, चिन्नौर, कामोद, दुबराज, हिंगा धान, बागी धान, दो दाना, डोकरा डोकरीसारख्या तांदळाच्या प्रजाती आढळतात. झारखंडमधील जोवा फूल, बंद फूल, भरा फूल, अग्नीसाल, अरसंगा, चैना भोग, कलमदानी, कनकचंपा या प्रजाती आहेत तर ईशान्य भारतात चकहाओ, बर्मा ब्लॅक, बाओ, बोर, जोहा, आहू, पंकज, जोया, बालम, रणजीत, बाशफूल, बोरा बेरोन, बास बेरोन, रंगा बोरा या प्रजाती आढळून येतात. उत्तरप्रदेशमध्ये दूधसार, महाराजी, भेरजी, भूतमुरी, तिलक चंदन, बिंदी, काला नमक, धनिया, नामचुनिया, सोना चुडा, शकर चीनी या तांदळाच्या प्रजाती आहेत तर काश्मीरच्या मश्क बुद्जी, बाएद बाबर, चोंडूर, शालीमार, गुलझाग, तिला झाग, कादीर बेग, कुमुद, बेगम धान या प्रजाती प्रसिद्ध आहेत.
कर्नाटकच्या म्हैसूर मल्लिगे, चिन्ना पोन्नी, राजभोग, राजमुडी, रत्नचुडी, बंगारसाळी, हलाबळ्ळू, सुग्गी, अनेकोम्बू, गजावली, केंभूती, बिलेकग्गा, कोळके या स्थानिक प्रजाती आहेत तर तमिळनाडूमध्ये करूप्पू कवनी, माप्पीलई सांबा, पूनगार, कट्टूयानम, किचली सांबा, थुयामल्ली सांबा, सीरगा सांबा, पोन्नी या तांदळाच्या प्रजाती आहेत. आंध्रप्रदेशमध्ये अरकलू, मोलाकोलुकुलू, सोनामसुरी, चिट्टी मुटयालू, स्वर्णा, तरंगिणी, पुष्यामी या तांदळाच्या प्रजाती आहेत. केरळमध्ये अरिकेराई, किरीपल्लण, कोचाथीकलरी, मट्टा पालक्कड, निवारा, पक्कली, वायनाड कायमा, मुल्लन काझ्मा या स्थानिक प्रजाती आहेत. तेलंगण राज्यात इंदूर सांबा, बथूकम्मा, तेलंगण सोना, सांबामसुरी या तांदळाच्या प्रजाती आहेत. पंजाब आणि हरियाणा हे बासमती, शरबती, सुगंधा अशा लांब आणि सुगंधी वाणांसाठी प्रसिद्ध आहेत.
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ या जागतिक समस्या संपूर्ण जगाला भेडसावू लागल्या आहेत. याचा खूप मोठा परिणाम हा शेतीवर झाला आहे. गेल्या वीस वर्षांत त्याने उग्र स्वरूप धारण केले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना कमी कसाच्या मातीत वाढणाऱ्या, पुराच्या पाण्यात किंवा पाण्याचा ताण सहन करणाऱ्या, रोगांना सहजी बळी न पडणाऱ्या, उत्पन्नाची हमी देणाऱ्या आणि मुख्य म्हणजे पोषणमुल्यांनी समृद्ध अशा स्थानिक तांदळाच्या जातींची आठवण झाली. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी तांदळाच्या स्थानिक प्रजाती शोधून वाढवायला सुरुवात केली.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.