आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
75937
आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात
‘सामाजिक बांधिलकी’चा उपक्रम; वेताळबांबर्डे वसतिगृहास साहित्य
सावंतवाडी, ता. ७ ः गरीब, गरजू, वंचित समाज घटकांना मदतीचा हात देणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने वेताळबांबर्डे येथील नाग्या महादू आदिवासी कातकरी समाजाच्या मुलांच्या वसतिगृहास भेट देऊन सुमारे ६० हजार रुपयांच्या शालेय व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी वसतिगृहाचे संचालक उदय आईर आणि सौ. आईर यांनी मुलांसह सामूहिक प्रार्थनेद्वारे प्रतिष्ठानच्या सदस्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांच्या प्रास्ताविकाने झाली. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे रवी जाधव यांनी मुलांशी संवाद साधला. अरुण मेस्त्री यांनी वसतिगृह संचालक श्री. आईर यांच्या कार्याचे कौतुक केले.
सावंतवाडी मोती तलाव कट्टा ज्येष्ठ नागरिक ग्रुप, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. देविदास बोर्डे, लीषा बांदेकर, कळसुलकर इंग्लिश स्कूलचे संचालक दत्तप्रसाद गोठस्कर, संजू शिरोडकर, नाईक फरसाण, माने गिफ्ट कॉर्नर महेश गोंधळेकर, कल्याण कदम, रवींद्र गगनग्रास, सचिन पिकुळकर आणि पंकज पेडणेकर यांनी सहकार्य केले. या वस्तू जमवण्यासाठी विशेष परिश्रम घेणाऱ्या रवी जाधव, रुपा गौंडर, शरदिनी बागवे आणि लक्ष्मण कदम यांचे विशेष कौतुक केले. वसतिगृहाचे संचालक श्री. आईर यांनी शासन स्तरावरून मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, खजिनदार रवी जाधव, रुपा गौंडर (मुद्राळे), संचालिका शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम आणि अरुण मेस्त्री उपस्थित होते.