वारकरी संप्रदाय एकात्मतेचे प्रतीक
swt77.jpg
75941
वेंगुर्लेः वारकरी संप्रदायातील मंडळींचा भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित प्रसन्ना देसाई, अॅड. सुषमा खानोलकर, सुहास गवंडळकर आदी.
वारकरी संप्रदाय एकात्मतेचे प्रतीक
प्रसन्ना देसाईः वेंगुर्लेत भाजपतर्फे ‘सन्मान वारकऱ्यांचा’
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ७ः वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनातील अनमोल परंपरा आहे. ‘वारी’ ही श्रद्धा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारी चळवळ आहे. ही परंपरा केवळ देवाच्या दर्शनापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी येथे केले.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून रविवारी (ता. ६) सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने ‘सन्मान वारकऱ्यांचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन येथील चांदेरकर बुवा विठ्ठल मंदिरात करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता मंदिराच्या आवारात टाळ-मृदंगाच्या निनादात, ‘राम कृष्ण हरी’ च्या गजरात आणि भगव्या पताका फडकावत वारकऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. वेशभूषा, पादुका, गळ्यातील माळा, डोक्यावर भगवे फेटे, हातात टाळ असे पारंपरिक वेशात आलेले वारकरी यावेळी उपस्थित होते. ‘माऊली माऊली’, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ या घोषणांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला.
यावेळी सावळाराम कुर्ले बुवांचा सत्कार ज्येष्ठ मच्छीमार नेते वसंत तांडेल यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून करण्यात आला. भाजपने सर्व क्षेत्रांमध्ये जबाबदारीने आपले योगदान दिले आहे. या उपक्रमाद्वारे वारकऱ्यांच्या शुद्ध जीवनशैलीला, सेवाभावाला व समर्पणाला सामाजिक श्रद्धेने वंदन केले असल्याचे यावेळी भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, माजी नगरसेविका श्रेया मयेकर, रसिका मठकर, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, युवा मोर्चाचे वैभव होडावडेकर, हेमंत गावडे, मनोहर तांडेल, हितेश धुरी, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, बुथप्रमुख रवींद्र शिरसाठ, प्रमोद गोळम, अरुण ठाकूर, प्रभाकर गावडे, भाऊ केरकर, कृष्णा पेडणेकर आदी उपस्थित होते.
या सत्कारामुळे भारावून गेल्याचे वारकरी संप्रदायातील मंडळींनी सांगितले. यावेळी किशोर रेवणकर, गोविंद परब, दाजी सावंत, अंकुश वराडकर, लता खोबरेकर, प्रमिला टांककर, रजनी वराडकर, शकुंतला कुर्ले, लक्ष्मी तांडेल, जोत्स्ना कुबल, गुणवंती परब, चंदना कुर्ले, सुप्रिया बांदेकर, दुर्वा कुबल, महेंद्र पालव, लता मसुरकर, केसरी खवणेकर, सहदेव गिरप, सुजाता कुर्ले, विठ्ठल वेंगुर्लेकर, श्रीमती मयेकर आदी २५ वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.