सह्याद्री निसर्ग मित्र'' हाक मारतेय, ओऽऽ देणाऱ्यांची कमी

सह्याद्री निसर्ग मित्र'' हाक मारतेय, ओऽऽ देणाऱ्यांची कमी

Published on

rat७p17.jpg-
75952
रत्नागिरी ः गोळा झालेल्या प्लास्टिकचे वर्गीकरण करताना महिला.
------------

दखल........लोगो

इंट्रो

जिल्ह्यातील चिपळूण शहर आणि परिसराचे प्लास्टिकमुक्तीसाठीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. यापासून इतर शहरे कधी शिकणार, असा प्रश्न पडतो. ‘सह्याद्री निसर्गमित्र’ चे यासाठीचे प्रयत्न २०२१ पासून सुरू आहेत. आता चिपळूण पालिकेची साथ त्यांना मिळणार आहे. याबाबतच्या घोषणा, लकी ड्रॉसारखी स्कीम, पैठण्या आदी युक्त्या योजण्यात हुशारी दाखवली आहे. नोकरशहा अशा वृत्तीने काम करणे आणि सजगता रस दाखवणे अपवादानेच दिसते. चिपळूण याबाबत सुदैवी मानले पाहिजे. पाठोपाठचे दोन पालिका मुख्याधिकारी उत्तम काम करणारे लाभले. सह्याद्री प्लास्टिकमुक्त चिपळूणसाठी साद जरूर घालत आहे. त्याला प्रतिसाद किती मिळतो, हे महत्त्वाचे.
- शिरीष दामले, रत्नागिरी
---------------

‘सह्याद्री निसर्गमित्र’ हाक मारतेय, ओऽऽ देणाऱ्यांची कमी

सह्याद्री करत असलेले काम जिकिरीचे आहे. त्यात कष्टाबरोबर चिकाटी आणि संयम लागतो. भाऊ काटदरे आणि त्यांचे सहकारी हे तो दीर्घकाळ दाखवत आहेत. महिन्याला १० टन प्लास्टिकचा पुनर्वापर सध्या सुरू आहे. शहर स्वच्छ राखणे, त्याचा बकालपणा कमी करणे, मायक्रोप्लास्टिकने होणारे प्रदूषण आणि विकार दूर ठेवणे अशा गोष्टी यातून साध्य होतात. असे असूनही या उपक्रमाला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळताना दिसत नाही, ही खेदाची बाब.
दापोलीचे प्रशांत परांजपे आणि त्यांचे सहकारीही याबाबत चिकाटीने प्रयत्न करत असल्यामुळे ही दोन शहरे तशी सुदैवी हवीत. इतरांकडे ना असा कार्यकर्ता, ना लोकांना चाड अशी स्थिती आहे. रत्नागिरीसारखे मोठे शहर दिवसेंदिवस अधिक बकाल होत आहे. प्लास्टिकमुक्ती केली पाहिजे हे उमजलं तरी अंमलात आणलं जात नाही, ही या क्षेत्रात काम करणारे भाऊ आणि त्यांचे सहकारी यांची खंत खरीच. प्लास्टिक पुनर्वापरासाठी प्रथम जमा करणे नंतर त्याचे विलीगीकरण करणे आणि योग्य ठिकाणी ते पाठवणे हा व्यवसायाचा आणि किफायतशीर भाग नाही. हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. सात प्रकारांचे प्लास्टिक कचऱ्यात टाकले जाते. ते त्या-त्या प्रकारानुसार वेगवेगळे करून ज्याच्यावर प्रक्रिया केली जाते, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाठवावे लागते. यात जमा करणे त्यासाठीची यंत्रणा आदींचा खर्च होतो. यातून पुनर्वापर झाला की, त्याचे पैसे मिळतात. ते एकूण खर्चाच्या फक्त २५ टक्के. उरलेले उभे करावे लागते. असा हा पदराला खार लागणाराच व्यवहार. चिपळूण शहरात साधारण २३ हजार घरे आहेत. त्यातून प्लास्टिक जमवण्यासाठी फक्त १५०० घरांतून प्रतिसाद मिळतो. थोडक्यात २१ हजार ५०० घरांतील प्लास्टिक हे नगरपालिकेच्या कचऱ्यातून जाते. नगरपालिका त्यांच्यापरीने प्रयत्न जरूर करते आहे. (चिपळूणचे हेही एक वैशिष्ट्य आणि कौतुकास्पद) मात्र सात प्रकारे त्याचे विलीगीकरण आदी गोष्टी कठीण असतात.
प्लास्टिक जमा करण्यासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेता येईल. या विद्यार्थ्यांच्या घरातील महिलांपर्यंत याचे महत्त्व पोहोचले, तर प्लास्टिक जमवणे सहजशक्य होईल. प्लास्टिक आणि कचरा जमवण्यातून महिलांना लुभावणारी पैठणीसाठीची पालिकेची स्पर्धाही महत्त्वाचीच ठरेल. एनसीसी, स्काऊट गाईड, एनएसएस यांसह इतर प्रकल्प करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील कचऱ्याचे विलगीकरण आणि प्लास्टिक जमवणे हा प्रकल्प म्हणूनच देता येईल. यातून मिळणारा फायदा साऱ्यांच्या लक्षात आला, तर सह्याद्रीच्या हाकेला ओ देणारे वाढतील. तोवर रत्नागिरीत गौरांग आगाशे आणि त्याचे सहकारी, दापोलीतील प्रशांत परांजपे आणि कोणी... अशा क्षेत्रात काम करणारे एकांडे शिलेदारच ठरणार. पैठणीसाठी प्लास्टिकवर हिरीरीने काम करण्यापेक्षा प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी जमवणे हा प्रवास शहाणीव वाढल्याचा द्योतक असेल. तो दिन लवकर यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com