-नाटक कंपनीच्या अध्यक्षपदी मानस संसारे
- rat७p५.jpg -
P२५N७५९५४
मानस संसारे
---
नाटक कंपनीच्या अध्यक्षपदी संसारे
चिपळूणमधील संस्था ; नवी कार्यकारिणीची निवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ७ ः शहरातील रंगभूमी क्षेत्रात आपल्या सृजनशील उपक्रमांनी गेली दहा वर्षे वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या नाटक कंपनीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. २०२५-२६ या कार्यकाळासाठी घोषित करण्यात आलेल्या या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी मानस संसारे, उपाध्यक्षपदी योगेश बांडागळे, सचिवपदी तुषार जाधव तर खजिनदारपदी श्रवण चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
नव्याने तयार केलेल्या कार्यकारिणीतील सदस्यपदी आदेश कांबळी, प्रद्युम्न देवधर, सावरी शिंदे, रसिका जोशी, राऊ चिंगळे आणि ओंकार भोजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाट्यकलेसोबतच सामाजिक भान जपणाऱ्या या संस्थेने गेल्या काही वर्षांत विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. कोरोना काळात ‘कोविड फायटर क्रिकेट लीग’ आयोजित करून कोरोना योद्ध्यांना एकत्र आणले. ‘बाल बाल देखो’ हे बालनाट्य इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद असताना समोरील पारावर सादर करण्यात आले. ‘हास्य तारांना हसवा’ हा कार्यक्रम एस. आर. जंगल येथे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात साजरा झाला. ‘हौसफूल’ या कार्यक्रमाचे पाच वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर ‘नाट्यरंग’ उपक्रमांतर्गत ‘संगीत मल्लिका’ आणि ‘चित्रकथी’ ही दोन नाटके विनामूल्य रसिकांसाठी सादर करण्यात आली. महापूराच्या काळात अनेक नागरिकांना गणेशमूर्ती विनामूल्य वाटप करण्यात आले तसेच नगर परिषद आणि विविध संस्थांच्या सहकार्याने स्वच्छतामोहीम, प्लास्टिकमुक्ती अभियान यामध्ये नाटक कंपनी, चिपळूण आघाडीवर राहिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.