-आईच्या मायेने बछड्याची घेतली २५ दिवस काळजी

-आईच्या मायेने बछड्याची घेतली २५ दिवस काळजी

Published on

-rat७p१९.jpg-
P२५N७५९६८
बिबट्याचा बछडा.
---
आईच्या मायेने बछड्याची घेतली काळजी
वनविभागाची २५ दिवस कसरत; संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेवर ठेवला भर
सकाळ वृत्तसेवा ः
लांजा, ता. ७ ः पुनस येथे सापडलेल्या बछड्याची आईबरोबर भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे बछड्याला सुरक्षित आणि त्याचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठीही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वनविभागाचे कर्मचारी चोवीस तास त्याच्या दिमतीला होते. बछड्याला संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छ ठेवले जात होते. आईच्या मायेने त्या बछड्याला एक नव्हे तर तब्बल २५ दिवस जपले. मादी बिबट्याची भेट न झाल्यामुळे अखेर त्याची रवानगी बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली.
पुनस येथील संसारेतिठ्याजवळ डांबरी रस्त्यावर बिबट्याचा बछडा आढळला. त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तो बछडा एक महिन्याचा नर होता. तो थोडा अशक्तही होता. बिबट्याच्या बछड्याला ८ मे ते २ जून असे एकूण २५ दिवस वनविभागाच्या अखत्यारित ठेवण्यात आले होते. डॉ. निखिल बनगर यांच्या निगराणीखाली बछडा सुस्थितीत होता. त्या बछड्याची देखरेख करताना त्याला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये याची काळजी घेण्यात येत होती. त्याकरिता बछड्याला हाताळताना हातमोजे घालणे, पाणी गरम करून घेणे, सर्व उपकरणे गरम पाण्याने धुऊन घेणे, बछड्याला ठेवलेली खोली स्वच्छ ठेवणे याप्रमाणे त्या बछड्याची देखरेख वनाधिकारी करत होते. डॉ. बनगर हे चोवीस तास बछड्याची देखरेख करत होते. बछड्याला संसर्ग होऊ नये म्हणून त्याला पूर्णपणे स्वच्छ ठेवण्यात येत होते. बछड्याला झोपण्यासाठी वापरण्यात आलेला प्लास्टिक टप वेळोवेळी स्वच्छ करूनच वापरण्यात येत होता. विभागीय वनाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने त्या बछड्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई या ठिकाणी संगोपनाकरिता सोडण्याचा निर्णय घेतला. २ जुलैला रोजी शासकीय वाहनाने वनपाल सारीक फकीर व डॉ. निखिल बनकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे पुढील संगोपनाकरिता वनाधिकारी व डॉ. विनया जंगले यांच्याकडे सुपूर्द केला. बिबट्याच्या बछड्याला सुपूर्द करताना त्याचे तापमान, वजन सुस्थितीत होते. वनविभागाचे डॉ. निखिल बनगर यांच्या देखरेखेखाली बछडा २५ दिवस होता. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपाल सारीक फकीर, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे यांनी बछड्याची अहोरात्र देखरेख केली. बिबट्याच्या बछड्याची निगराणी ही विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती.
---
थर्मल ड्रोनद्वारेही मादीचा शोध
बछड्याच्या आईचा शोध घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी विभागीय कोल्हापूर येथे संपर्क साधून कोल्हापूर वनविभागाचा थर्मल ड्रोन मागवला होता. कोल्हापूरच्या पथकाने पुनस येथे ज्या ठिकाणी बिबट्याचा बछडा मिळाला होता तिथे थर्मल ड्रोनद्वारे दिवसा व रात्री तपासणी केली; परंतु त्यात मादी बिबट्या दिसून आली नाही.
---
कोट
वन्यजीव कोठे अडचणीत सापडल्यास किंवा अशा प्रकाराची घटना घडल्यास वनविभागाच्या १९२६ टोल क्रमांकावर संपर्क साधा.
- गिरिजा देसाई, विभागीय वनाधिकारी
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com