रत्नागिरी - मिऱ्या-नागपूर महामार्गाचे २२ टक्के काम अपुर्ण
rat7p11.jpg-
75946
रत्नागिरी ः मिऱ्या-नागपूर महामार्गावरील परटवणे येथे सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम.
----------------
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे २२ टक्के काम अपूर्ण
मार्च २०२६ पर्यंत होईल पूर्ण; ५६ किमीपैकी ४१ किमीचे काँक्रिटीकरण
एक नजर
* ९३० कोटीचे या टप्प्यातील काम
* १५ किमी काँक्रिटीकरण अजून बाकी
* ४५० मीटरचे भूसंपादन बाकी
* २०५ मोऱ्यांच्या कामांपैकी १४६ मोऱ्या पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : मिऱ्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गातील मिऱ्या ते आंबाघाटापर्यंतच्या टप्प्याचे चौपदरीकरणात काम ७८ टक्के झाले आहे. उर्वरित काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा रवी इन्फ्रा बिल्ड प्रा. लि. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.
मिऱ्या ते आंबा असा ५६ किमीच्या टप्प्याचे काम रवी इन्फ्रा कंपनीकडे आहे. या रस्त्यासाठी ९३० कोटी रुपये खर्च येणार आहे. रवी इन्फ्रा या कंपनीकडून हे काम सुरू आहे. साधारणतः ७८ टक्के कामे पूर्ण झाले आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे काँक्रिटीकरणाचे ४१ किमीचे काम पूर्ण झाले आहे. १५ किमीचे काम अजून बाकी आहे. यामध्ये जे. के. फाईल्स येथे ५०० मीटरचे काम बाकी आहे.
रत्नागिरी ते मिऱ्या व पाली ते आंबा असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. परटवणे येथील गणपतीपुळे जंक्शन आणि तटरक्षक दल येथील दीड किमी काम बाकी आहे. साळवीस्टॉप ते विमानतळदरम्यान अधूनमधून १ किमी काम बाकी आहे. नाणीज, दाभोळे येथे प्रत्येकी १ किमी, दाभोळे येथे अडीच किमी बायपास साखरपा येथे १ किमी हे अंडरपासचे तर दाभोळे येथे दरडीचे काम बाकी आहे.
साखरपा येथील कोंडगाव येथे नव्याने अंडरपास प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. तेथे ३० मीटर रूंदीचा २४ मीटर लांबीचा आणि साडेपाच मीटर उंचीचा अंडरपास काम करायचे आहे. आंबाघाटात एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. आता या संपूर्ण मार्गामधील ४५० मीटरचे भूसंपादन बाकी आहे. २०५ मोऱ्यांच्या कामांपैकी १४६ पूर्ण झाल्या आहेत. छोटे पूल एकूण ८ आहेत. त्यापैकी ५ पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये अंडरपास छोटे नाणीज व साखरपा येथे काम पूर्ण झाले आहे. मोठे अंडरपास नाणीज व कोंडगाव येथे प्रत्येकी १ आहे. त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. दाभोळे येथे उड्डाणपूल ३५० मीटर लांबीचा त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.