शिडवणे शाळेत ''उत्कर्षा'' प्रशिक्षण
swt७२४.jpg
76010
शिडवणे ः येथील शाळा क्रमांक १ मध्ये आयोजित आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना आशा सेविका आरती शिंदे.
शिडवणे शाळेत ‘उत्कर्षा’ प्रशिक्षण
तळेरेः येथील शिडवणे क्रमांक १ शाळेत किशोरवयीन मुलींसाठी ‘उत्कर्षा प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिडवणे आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका प्रांजल बारस्कर-दुखंडे आणि आशासेविका आरती शिंदे यांनी या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. त्यांना शाळेच्या उपशिक्षिका सीमा वरुणकर आणि पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी यांनी सहकार्य केले. या प्रशिक्षण सत्रात उपस्थित किशोरवयीन मुलींना आरोग्याशी संबंधित विविध पैलूंवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. पौगंडावस्थेत होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, योग्य आहार-विहाराचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छतेचे फायदे आणि या वयात उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर कशी मात करावी? याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. आरोग्यसेविकांनी मुलींच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. या ‘उत्कर्षा प्रशिक्षणामुळे’ किशोरवयीन मुलींना त्यांच्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
-----
swt७२५.jpg
76011
वेंगुर्ले ः मठ येथे भूमिगत विद्युत वाहिनी कामाचे भूमिपूजन करताना सचिन वालावलकर.
भूमिगत वीज कामाचे मठ येथे भूमिपूजन
वेंगुर्लेः मठ गावात ११ केव्ही विद्युत लाईनच्या भूमिगत कामासाठी सुमारे १६ लाख रुपयांचा निधी आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या कामचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावालकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, मठ सरपंच रुपाली नाईक, आबा मठकर, माजी सरपंच किशोर पोतदार, अजित नाईक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.